वनविभागाच्या क्रीडा स्पर्धांना शहादा येथे प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:42 PM2020-01-22T12:42:14+5:302020-01-22T12:42:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील वसंतराव नाईक शैक्षणिक क्रीडा संकुलात नंदुरबार व शहादा वनविभाग यांच्या वनक्रीडा सप्ताहांतर्गत जिल्ह्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील वसंतराव नाईक शैक्षणिक क्रीडा संकुलात नंदुरबार व शहादा वनविभाग यांच्या वनक्रीडा सप्ताहांतर्गत जिल्ह्याच्या क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ वनविभागाचे उपवनसंरक्षक एस.बी. केवटे यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे समन्वयक संजय राजपूत, शहादा वनक्षेत्रपाल अनिल पवार, सहायक वनसंरक्षक जी.आर. रणदिवे, चिंचपाडा येथील वनक्षेत्रपाल राजेंद्र पवार, एस.जी. पवार व जिल्ह्यातील वनक्षेत्रपाल उपस्थित होते. प्रारंभी शैक्षणिक क्रीडा संकुलातील मैदानावर उपवनसंरक्षक केवटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून वनविभागातील कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी सतत खेळांवर लक्ष केंद्रीत करावे. खेळाच्या माध्यमातून प्रेम व सद्भावना वातावरण निर्मिती होते. आपल्या व्यस्त कामातून खेळासाठी वेळ द्यावा, त्यासाठी शासनाने राष्ट्रीय पातळीवर क्रीडा सप्ताहाचे आयोजन केल्याचे केवटी यांनी सांगितले. सूत्रसंचालन वनक्षेत्रपाल अनिल पवार यांनी केले. स्पर्धेत शहादा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, धडगाव व तळोदा तालुक्यातील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. क्रीडा स्पर्धेत व्हालीबॉल, कबड्डी, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, कॅरम, बुद्धिबळ आदी स्पर्धांचा समावेश होता. यातून तीन यशस्वी खेळाडूंची निवड केली जाईल. राज्यात पाच विभाग करण्यात असून असून त्यातून महाराष्ट्राच्या संघाची निवड केली जाईल. पंच म्हणून प्रा.आर.आर. सोनवणे, प्रा.भारत चाळसे, सुनील पावरा यांनी काम पाहिले तर वनपाल आर.बी. रुईकर, एस.एस. देसले, प्रवीण वाघ, बी.आर. शहा, डी.डी. पाटील, पी.एम. सोनार, डी.ए. परदेशी यांचे सहकार्य लाभले.