नवापूर, शहादा, नंदुरबारचे चार नगरसेवक अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:47 PM2018-11-23T12:47:06+5:302018-11-23T12:49:57+5:30
नंदुरबार : जात पडताळणी प्रमाणपत्राच्या कारणावरून नवापूरचे दोन तर तिसरे अपत्याचा कारणावरून शहाद्याच्या एका नगरसेवकाला जिल्हाधिका:यांनी अपात्र ठरविले आहे. ...
नंदुरबार : जात पडताळणी प्रमाणपत्राच्या कारणावरून नवापूरचे दोन तर तिसरे अपत्याचा कारणावरून शहाद्याच्या एका नगरसेवकाला जिल्हाधिका:यांनी अपात्र ठरविले आहे. याआधीच नंदुरबारच्या एका नगरसेविकेला तिस:या अपत्यामुळे अपात्र ठरविण्यात आले आहे. नगरसेवक पदाच्या संबधीत जागा रिक्त झाल्याचेही या अध्यादेशात नमुद करण्यात आले आहे.
नवापूर येथील प्रभाग क्रमांक सहा अ या ओबीसी महिला राखीव जागेवर सारिका मनोहर पाटील व प्रभाग क्रमांक सात अ या ओबीसी पुरुष राखीव जागेवरून दर्शन प्रताप पाटील हे काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते ते अपात्र ठरले. पराभूत उमेदवार नैन्सी राकेश मिस्त्री व अतुल तांबोळी यांनी खोटे जातप्रमाणपत्र दोघांनी सादर केल्याचा आरोप केला होता. शिवाय जात प्रमाणपत्र समितीकडे तक्रार केली होती. त्यानुसार जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सारिका पाटील व दर्शन पाटील यांचा इतर मागासवर्ग जातीचा दाखला अमान्य केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी दोन्ही नगरसेवकांना नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार अपात्र ठरविले आहे.
शहाद्यातही एकजण अपात्र
तिस:या अपत्याच्या कारणावरून शहादा पालिकेतील राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेवकाचे सदस्यपद रद्द झाल्याने विद्यमान पालिकेतील राष्ट्रवादीचे अस्तित्व संपुष्टात आले.
डिसेंबर 2016 मध्ये झालेल्या पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7-ब मधून शेख इकबाल शेख सलीम हे राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक निवडून आले होते. शेख यांनी काँग्रेसचे राकेश पाटील यांचा पराभव केला होता. निवडणुकीनंतर शेख यांना तिसरे अपत्य झाल्याने काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक मकरंद पाटील यांनी शेख यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी जिल्हाधिका:यांकडे केली होती.
मकरंद पाटील यांच्या तक्रारीवरुन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी वेळोवेळी सुनावणी घेऊन चौकशीअंती महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 16 व 44 प्रमाणे शेख इकबाक शेख सलीम यांना दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यामुळे त्यांना अपात्र घोषित करुन प्रभाग क्रमांक 7-ब चे सदस्यपद रिक्त असल्याचा निर्णय दिला.
नंदुरबारातही एक जण अपात्र
नंदुरबारात देखील यापूर्वी एका महिला सदस्याला तिस:या अपत्याप्रकरणी अपात्र घोषीत करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील कल्याणी अजरून मराठे यांना तिसरे अपत्य असल्याबाबत विठ्ठल चौधरी यांनी हरकत घेतली होती. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होऊन जिल्हाधिका:यांनी कल्याणी मराठे या शिवसेनेच्या नगरसेविकेस अपात्र ठरविले होते.
जिल्ह्यात गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत तिसरे अपत्यामुळे दोन तर जातीच्या दाखल्याच्या हरकतीवरून दोन असे एकुण चार नगरसेवक अपात्र ठरविण्यात आले आहे. आता निवडणूक विभागातर्फे या जागांवर कधी निवडणूक घेतली जाते याकडे आता लक्ष लागून आहे.