लोकन्यायालयांमध्ये तीन हजार प्रकरणांत चार कोटी आठ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:32 AM2021-09-27T04:32:58+5:302021-09-27T04:32:58+5:30

तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ ए. एस. भागवत, वरिष्ठ स्तर दिवाणी न्या. एस. टी. मलिये, मुख्य न्यायदंडाधिकारी न्या. व्ही. जी. चव्हाण ...

Four crore eight lakhs were recovered in three thousand cases in the Lok Sabha | लोकन्यायालयांमध्ये तीन हजार प्रकरणांत चार कोटी आठ लाखांची वसुली

लोकन्यायालयांमध्ये तीन हजार प्रकरणांत चार कोटी आठ लाखांची वसुली

Next

तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ ए. एस. भागवत, वरिष्ठ स्तर दिवाणी न्या. एस. टी. मलिये, मुख्य न्यायदंडाधिकारी न्या. व्ही. जी. चव्हाण यांनी पॅनलप्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांच्या मदतीसाठी विधि महाविदयालयाचे प्राचार्य एन. डी. चौधरी, ॲड. सीमा खत्री, ॲड. शारदा पवार, ॲड. प्रियंका गावित, ॲड. चतुर पाटील, ॲड. जाकीर पिंजारी यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. कनिष्ठ स्तर पहिले सह दिवाणी न्या. वाय. के. राऊत, कनिष्ठ स्तर दुसरे सहदिवाणी न्या. एन. बी. पाटील, तसेच या लोकअदालतीच्या प्रसंगी नवीन नियुक्त न्यायिक अधिकारी एस. एस. बडगुजर, ए. आर. कुलकर्णी, एस. बी. मोरे, पी. एम. काजळे, आरती बनकर, एम. बी. पाटील, एस. आर. पाटील हजर होते. किरकोळ स्वरूपाची फौजदारी प्रकरणे तातडीने निकाली करण्यासाठी स्पेशल ड्राईव्हचे कामकाज केले, तसेच सदर लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा न्यायालयातील प्रबंधक आर. जी. वाणी, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. कमलाकर सावळे, न्यायालयीन कर्मचारी व विधिज्ञ यांनी मोलाचे सहकार्य केले.

Web Title: Four crore eight lakhs were recovered in three thousand cases in the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.