अतीवृष्टीतील नुकसानीच्या भरपाईसाठी चार कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:28 PM2019-09-25T12:28:35+5:302019-09-25T12:28:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या काळात झालेल्या अतीवृष्टीत बाधित झालेल्या 20 हजार शेतक:यांना सुमारे ...

Four crore proposed to compensate for the loss of rain | अतीवृष्टीतील नुकसानीच्या भरपाईसाठी चार कोटींचा प्रस्ताव

अतीवृष्टीतील नुकसानीच्या भरपाईसाठी चार कोटींचा प्रस्ताव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या काळात झालेल्या अतीवृष्टीत बाधित झालेल्या 20 हजार शेतक:यांना सुमारे चार कोटी रुपयांची भरपाई देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आह़े कृषी आणि महसूल विभागाच्या संयुक्त पंचनाम्यांच्या अहवालानुसार ही मागणी करण्यात आली आह़े              
जिल्ह्यात यंदा दमदार पावसामुळे 2 लाख 88 हजार 804 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली होती़ सरासरीच्या 108 टक्के पेरण्या पूर्ण झाल्याने शेतक:यांमध्ये समाधान होत़े दरम्यान ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात अतीवृष्टी झाल्याने कोरड आणि बागायदार शेतक:यांना फटका बसला आह़े यातून त्यांच्या शेतातील माती आणि पिक वाहून गेल्याचे सांगण्यात आल्यानंतर परिस्थितीजन्य पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले  होत़े यानुसार महिनाभरापासून सुरु असलेले पंचनामे गेल्या आठवडय़ात पूर्ण करुन प्रशासनाला नुकसानीचा आकडा प्रस्तावित करण्यात आला आह़े परंतू यात शेतक:यांच्या संख्येच्या तुलनेत प्रत्यक्ष क्षेत्राच्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याने पंचनाम्यांमध्ये गोंधळ झाल्याचे स्पष्ट झाने आह़े जिल्ह्यात किमान 1 लाख हेक्टर शेतजमिन आणि पिकांचे नुकसान झाल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े परंतू पंचनाम्यांच्या अंतिम अहवालात ही आकडेवारी केवळ 13 हजार हेक्टर दाखवण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला आह़े  कृषी आणि महसूल विभागाने तयार केलेल्या अहवालात अतीवृष्टीबाधित 20 हजार 155 शेतक:यांना किमान 3 कोटी 81 लाख 54 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे म्हटले आह़े 
कोरडवाहू क्षेत्रात 33 टक्के नुकसानीसाठी प्रती हेक्टर 6 हजार 800 तर अधिक नुकसान झाल्यास 1 लाख 36 हजार प्रती हेक्टर मदतीचे निर्धारण करण्यात आले आह़े बागायती क्षेत्रासाठी प्रती हेक्टर 1 लाख 35 हजार व त्यापेक्षा अधिक मदत प्रस्तावित आह़े बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीच्या प्रस्तवित रकमेचाही प्रस्ताव कृषी विभागाने महसूल खात्याकडे दिला आह़े 
हा प्रस्ताव अद्याप जिल्हा प्रशासनाकडेच असून निवडणूक आचारसंहितेमुळे तो रखडण्याची चिन्हे आहेत़ यामुळे बाधित शेतक:यांना भरपाई मिळणार कधी, याकडे लक्ष लागून राहणार आह़े 

कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 12 हजार 991 कोरडवाहू शेतक:यांच्या मालकीच्या 7 हजार 440 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आह़े या नुकसानीची भरपाई म्हणून शेतक:यांना 1 कोटी 51 लाख 17 हजार रुपये देण्याचे प्रस्तावित आह़े 
नंदुरबार तालुक्यातील 804 शेतक:यांना 43 लाख 776, नवापुर तालुक्यात 609 शेतक:यांना 6 लाख 89 हजार, अक्कलकुवा- 3 हजार 320 शेतक:यांना 45 लाख 29 हजार, शहादा- 5 हजार 619 बाधित शेतक:यांना 64 लाख 19 हजार, तळोदा - 2 हजार 339 शेतक:यांना 21 लाख 54 हजार तर धडगाव तालुक्याच्या 210 शेतक:यांना 11 लाख 26 हजार रुपयांची मदत प्रस्तावित आह़े
नंदुरबार तालुक्यात 2 हजार 145, नवापुर तालुक्यात 337, अक्कलकुवा 222, शहादा 3 हजार 138, तळोदा 1 हजार 56 तर धडगाव तालुक्यात 540 हेक्टर शेतजमिनीचे अतीवृष्टीमुळे नुकसान झाले असल्याचे अहवालात म्हटले आह़े 
अहवालात कोरडवाहू क्षेत्राचा आकडा 7 हजार 440 हेक्टर असला तरी तो 74 हजार असा असल्याचे सांगण्यात आले आह़े परंतू त्यावर विभागाचे एकमत नसल्याने संभ्रम कायम आह़े यामुळे आकडेवारी पुन्हा नव्याने संकलित होण्याची शक्यात आह़े 

बागायत क्षेत्रातील 7 हजार 164 शेतक:यांच्या 5 हजार 661 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आह़े प्रत्यक्षात हा आकडा 56 हजार 661 असल्याची माहिती आह़े यामुळे बागायत क्षेत्रातील आकडेवारीचीही पडताळणी होणार किंवा कसे, याकडे लक्ष लागून राहणार आह़े बाधित शेतक:यांना 2 कोटी 29 लाख 29 हजार रुपयांची भरपाई देण्याचा प्रस्ताव आह़े नंदुरबार-571, नवापुर 125, अक्कलकुवा 850, शहादा 3 हजार 741, तळोदा 1 हजार 877 तर धडगाव तालुक्यातील 210 शेतक:यांना भरपाई प्रस्तावित आह़े 
 

Web Title: Four crore proposed to compensate for the loss of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.