वेगवेगळ्या अपघातात जिल्ह्यात चारजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:40 PM2018-12-15T12:40:18+5:302018-12-15T12:40:23+5:30

वैद्यकीय अधिका:यासह दोन महिलांचा मृतांमध्ये समावेश, कौठळ, अक्कलकुवा व तळोद्यातील घटना

Four people died in different accidents in the district | वेगवेगळ्या अपघातात जिल्ह्यात चारजण ठार

वेगवेगळ्या अपघातात जिल्ह्यात चारजण ठार

Next

नंदुरबार : जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन अपघातांमध्ये चारजण ठार झाल्याची घटना घडली. कवठळनजीक वैद्यकीय अधिकारी व आणखी एकजण, अक्कलकुव्यात प्रवासी महिला तर तर नवागाव येथेही महिलेचा समावेश आहे. 
शहादा-कहाटूळ रस्त्यावर शुक्रवारी दुपारी अपघात झाला. कहाटूळ आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ.रमेश मोहन पाटील (54) हे शहादाकडून कहाटूळ गावाकडे आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच 39 एच 4722) जात होते. त्यांच्यासोबत डीडीसी बँकेत शिपाई म्हणून कार्यरत असलेले प्रताप दामू शिरसाठ होते. गावाजवळील वळणावर समोरून कापूस भरून आलेल्या अॅपे रिक्षाने (क्रमांक एमएच 15 सीके 4614) जबर धडक दिली. त्यात दुचाकीवरील डॉ.रमेश पाटील व प्रताप शिरसाठ हे जबर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातानंतर रिक्षा देखील उलटल्याने रिक्षातील हेमंत माळी व दौलत माळी हे दोनजण जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत शहादा पोलिसात उशीरार्पयत अपघातान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दुसरी घटना अक्कलकुवा बसस्थानकात घडली. बसखाली चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.  चालकाविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेनाबाई किर्ती वसावे (40) रा.काकर्दापुनर्वसन, ता.शहादा असे मयत महिलेचे नाव आहे. अक्कलकुवा बसस्थानकात बस (क्रमांक एमएच 20 बीएल 0117) वळणावरून येत असतांना चालकाकडील बाजुने मागील चाकाखाली गेनाबाई वसावे आल्या. त्यात त्या चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलीस नाईक विजू वसावे यांनी फिर्याद दिल्याने चालक जितेंद्र सुरसिंग मोरे, रा.नंदुरबार यांच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार मुकेश पवार करीत आहे. 
तिसरी घटना तळोदा तालुक्यात घडली. दुचाकीवरून पडल्याने जखमी झालेल्या महिलेचा सुरत येथे उपचार घेतांना मृत्यू झाला. संगिता बहादुरसिंग वळवी (28) रा.नवागाव, ता.तळोदा असे मयत महिलेचे नाव आहे. महिला दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने स्थानिक आणि त्यानंतर सुरत येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेतांना तिचा मृत्यू झाला. याबाबत तळोदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार जाधव करीत आहे.
 

Web Title: Four people died in different accidents in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.