इमारतीत मधमाशांच्या चाव्यात नगरसेवकासह चारजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:01 PM2019-03-06T12:01:32+5:302019-03-06T12:01:38+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय : अर्धा ते पाऊण तास झाली पळापळ
नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात मधमाशांच्या चाव्याने नगरसेवकासह कार्यक्रमासाठी आलेल्या तीन ते चार अंगणवाडी सेविका जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रशासकीय इमारतीत काही काळ गोंधळाचे वातावरण झाले. परिणामी कर्मचा:यांनी आपापले कार्यालयाच्या खिडक्या बंद केल्याने पुढील अनर्थ टळला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या तिस:या मजल्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मधाचे पोळे आहे. दिवसेंदिवस ते मोठे होत आहे. इतरही ठिकाणी लहान मोठे पोळे आहेत. आतार्पयत या मधमाशांपासून कर्मचारी किंवा सामान्य नागरिकांना काहीही त्रास झाला नव्हता. परंतु मंगळवारी मधमाशा अचानक चवताळल्या.
दुपारी तीन वाजेच्या सुमारास चवताळलेल्या मधमाशा मुख्य इमारतीच्या पहिल्या व दुस:या मजल्यावर पसरल्या. याच वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात कामे घेवून आलेले भाजपचे नगरसेवक देखील होते. अभ्यागत कक्षाच्या जवळच अचानक आलेल्या मधमाशांनी तेथे उभे असलेल्यांना चावा घेण्यास सुरुवात केली. त्यात नगरसेवक प्रशांत चौधरी यांना मोठय़ा प्रमाणावर मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांना मोठय़ा प्रमाणावर ईजा झाली. याशिवाय श्रमधन कार्यक्रमासाठी आलेल्या तीन ते चार अंगणवाडी सेविका महिलांना देखील मधमाशांनी चावा घेतला. सर्वानी जिल्हा रुग्णालयात जावून उपचार घेतला.
अचानक चवताळलेल्या मधमाशांमुळे जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत एकच धावपळ उडाली. अनेक कार्यालयातील कर्मचा:यांनी कार्यालयाच्या खिडक्या व दारे बंद करून घेतली तर मुख्य गेट देखील काही काळ बंद करून घेण्यात आले. साधारणत: अर्धा ते पाऊण तासानंतर मधमाशा परत गेल्याने कर्मचारी व तेथे आलेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
दरम्यान, या ठिकाणी असलेल्या मधमाशाच्या लहान, मोठे पोळे हटवावे अशी मागणी कर्मचा:यांकडून करण्यात येत आहे. यापुढेही असा प्रकार झाल्यास समस्या निर्माण होऊ शकते. ज्या कार्यालयाच्या भिंतीवर मधाचे पोळे आहे त्या कर्मचा:यांना जीव मुठीत घेवूनच दिवस काढावा लागत असल्याचे सांगण्यात आले.