वनविभाग परत करणार बारी येथील चौघांचे जप्त केलेले लाकूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:45 PM2019-08-31T12:45:16+5:302019-08-31T12:45:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील बारी या गावातून महाराष्ट्र व गुजरात वन विभागाच्या काल झालेल्या संयुक्त कारवाईत अवैध ...

Four of the seized timber from Bari will be returned to the forest department | वनविभाग परत करणार बारी येथील चौघांचे जप्त केलेले लाकूड

वनविभाग परत करणार बारी येथील चौघांचे जप्त केलेले लाकूड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील बारी या गावातून महाराष्ट्र व गुजरात वन विभागाच्या काल झालेल्या संयुक्त कारवाईत अवैध लाकुड, तयार फर्निचर आणि चार रंधा मशीन असा 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता़ कारवाईदरम्यान चार ग्रामस्थांचे घराचे जुने लाकूडही जप्त केले गेल्याने दोन्ही राज्याच्या वन विभागाकडून ते परत करण्याचा निर्णय घेतला गेला आह़े 
सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे, गुजरातचे डांग व तापी डिव्हिजनचे उप वनसंरक्षक विवेक तोडकर, सहाय्यक वनसंरक्षक जिगर अमीन, सहाय्यक वनसंरक्षक गोविंद सुरया, उच्छल वनक्षेत्रपाल उपेंद्र राऊलजी, नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, चिंचपाडा वनक्षेत्रपाल आऱबी़पवार, फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल अनिल पवार, पोलीस उपनिरीक्षक  शिवाजी नागवे यांच्यासह नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा व गुजरात राज्य राखीव दल व वनविभागाच्या 500 कर्मचा:यांनी गुरुवारी नवापुर तालुक्यातील बारी गावात  संशयित घरांची झडती घेऊन ताज्या व अवैध तोडीचे खैर, शिसम व सागाचे साठवून ठेवलेले लाकूड, तयार बेड व सोफासेट व चार रंधा मशिन जप्त केले होते. 
दोन ट्रक, एक टेम्पो, तीन जीप भरुन लाकुड काढण्यात आल्याने जप्त मालाची मोजदाद होऊ शकली नव्हती़ उच्छल वनक्षेत्रात मालाची गुरुवारी मोजदाद करण्यात आली होती़ सकाळी 9 वाजेपासून 50 कर्मचा:यांनी मालाची मोजदाद सायंकाळी 5 वाजता पूर्ण केली. कारवाईत 2 लाख रुपये किमतीचे चार रंधा मशीन, 1 लाखाचे बेड व सोफासेट हे तयार फर्निचर व शासकीय दराने पावणेसात लाख रुपयांचे 14 घनमीटर 635 नग लाकूछ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता़ 
बाजार भावाप्रमाणे लाकडाची किंमत 12 लाखाच्या जवळपास आह़े बारी गावातून जप्त केलेल्या मालाची आवक गुजरात राज्यातूनच झाली असल्याचा अंदाज आहे. जप्त मालाची समसमान वाटणी  करण्यात येणार किंवा कसे या बाबत दोन्ही राज्यातील वरिष्ठ अधिका:यांची बैठक लवकरच  आयोजित करून धोरणात्मक निर्णय होणार आहे. 
दरम्यान, सहाय्यक वन संरक्षक गणेश रणदिवे यांनी नंदुरबार उपवन संरक्षक सुरेश केवटे व मुख्य वनसंरक्षक धुळे यांना कारवाईचा अहवाल शुक्रवारी सादर केला. यापुढेही अशाच प्रकारे संयुक्त कारवाई होणार असल्याने त्यांनी यावेळी सांगितल़े 
दरम्यान, चार जणांचे घरकूल योजनेचे काम सुरु असल्याने त्यांच्या घरांचे छप्परचे व चारही बाजुंचे लाकुड काढून ठेवण्यात आले होत़े हे लाकूड 40 ते 50 वर्ष जुने आह़े या कारवाईत ते लाकूडही जप्त करण्यात आले होत़े संबंधितांनी वन विभागात संपर्क करुन याविषयी सत्यता पटवून देण्याचा प्रय} केला होता़ वन विभागाने शहनिशा करुन चौघांचेही लाकूड परत करण्याचा निर्णय घेतला आह़े वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांनी गुजरात वनविभागास या संबंधी पत्रव्यवहार केला असून संमती घेण्याचा प्रय} चालविला आहे. लवकरच संबंधिताना त्यांचे लाकुड मिळेल असे हाडपे यांनी सांगितल़े हे करतांना ताज्या तोडीच्या लाकडाबाबत खबरदारीदेखील घेतली जात आहे.

Web Title: Four of the seized timber from Bari will be returned to the forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.