चार वरिष्ठ पदे प्रभारींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 12:00 PM2020-10-06T12:00:49+5:302020-10-06T12:00:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील तीन वरिष्ठ तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. परंतु त्यांच्या जागी अद्याप ...

Four senior positions in charge | चार वरिष्ठ पदे प्रभारींवर

चार वरिष्ठ पदे प्रभारींवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील तीन वरिष्ठ तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. परंतु त्यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती झाली नाही. दोन उपविभागीय अधिकाऱ्यांचा पदभार हा पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकाºयांकडे सोपवावा लागला आहे. दोन राज्यांच्या सिमेवरील जिल्हा असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तातडीने वरिष्ठ अधिकाºयांची रिक्त पदे भरावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या आठवड्यात अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अक्कलकुवाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि मुख्यालयातील गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक सिताराम गायकवाड यांच्या बदल्या झाल्या आहेत. याशिवाय महिनाभरापूर्वी नंदुरबारचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार हे महिनाभरापूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत.
नंदुरबार पोलीस दलाची रचना पहाता जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक, नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि त्या त्या पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व त्याअंतर्गत येणारे दूरक्षेत्र अशी रचना आहे.
सद्य स्थितीत जिल्ह्यात दोन अपर पोलीस अधीक्षक, दोन उपविभागीय पोलीस अधिकारी व एक पोलीस उपअधीक्षक यांची पदे रिक्त आहेत. नुकत्याच झालेल्या बदल्यांच्या वेळी या जागांवर कुणाही अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे इतर अधिकाºयांकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.
जिल्हा दोन राज्यांच्या सिमेवर असल्याने आणि दोन प्रमुख महामार्ग गेलेले असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा नेहमीच सवेंदनशील राहिला आहे. नंदुरबार व शहादा शहरात तर नेहमीच अलर्ट राहावे लागते. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरील चार पदे रिक्त राहणे म्हणजे मोठी कसरतच आहे. सद्य स्थितीत पोलीस अधीक्षक व एक उपविभागीय पोलीस अधिकारी वगळता एकही वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात नाहीत. त्यामुळे ऐनवेळी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाल्यास पोलीस दलाला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे शासनाने तातडीने बदली आणि सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदांवर अधिकाºयांची नेमणूक करावी अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून आणि पोलीस दलाकडून देखील व्यक्त होत आहे.

Web Title: Four senior positions in charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.