आकडीमुक्तीसाठी तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात चार हजार विजमीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 10:48 AM2017-11-23T10:48:44+5:302017-11-23T10:48:55+5:30
Next
ल कमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात होत असलेली वीजचोरी व आकडीमुक्त गावासाठी दुर्गम भागात दोन महिन्यात 4 हजार 300 विजमीटर बसविण्यात आले आह़े विजमीटर बसविल्यामुळे परिसरातील विद्युत रोहित्र जळण्याच्या प्रकारातही घट होत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आह़े परंतु यात अधिक वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आह़ेतळोदा तालुक्यातील दुर्गम भागात प्रत्येक घरी जावून मीटर बसवून आकडीमुक्त गाव करण्यासाठी महावितरणकडून ‘वीज आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आह़े त्याअंतर्गत सर्वाधिक वीजचोरीसाठी कुप्रसिध्द असलेल्या गावांमध्ये चोरी रोखण्यासाठी विजमीटर बसविण्यात येत आह़े दोन महिन्यांपूर्वी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाला सुरुवातही करण्यात आली होती़ दोन महिन्यात महावितरणकडून 4 हजार 300 मीटर बसविण्यात आले आह़े येत्या काळात ही आकडेवारी अधिक वाढणार असल्याचे महावितरणच्या अधिका:यांकडून सांगण्यात आले आह़े तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या लाखापूर, सिलींगपूर, मोकसमाळ, गायमुखीपाडा अशा ठिकाणी महावितरण कंपनीकडून वीज जोडणीची कामे मोठय़ा प्रमाणात हाती घेण्यात आली आह़े त्याच प्रमाणे तालुक्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकांचे ठरावही प्रत्येक गावातून मागविण्यात आले असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आह़े या ठरावांना मंजुरी मिळाल्यानंतर गावातीलच वायरमन, लाईनमन यांना या कर्मचा:यांची मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे यातून संबंधित गावातील स्थानिक बेरोजगारांचीही यात मदत होते काय याचीही चाचपणी यानिमित्ताने करण्यात येणार आह़े ‘वीज आपल्या दारी’ या योजनेच्या पूर्वी तालुक्यातील ग्रामीण भागात विजमिटर बसविण्याचे काम अतिशय संथ गतीने सुरु होत़े त्यामुळे अशा पध्दतीने कारभार सुरु असला तर, आकडीमुक्त गावाची संकल्पना कशी पूर्णत्वास येणार असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला होता़शासनाकडून ग्रामीण भागात विजचोरीच्या घटना थांबविण्यासाठी प्रत्येक घरी विशेषत ग्रामीण भागात विजमिटर बसविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आल्याने आता समाधान व्यक्त करण्यात येत आह़ेविजमीटर बसविण्याला अधिक गती देण्याची आवश्यकताग्रामीण भागात विजमिटर नसल्याने अनेक वेळा आकडे टाकून विजेची चोरी करण्यात येत असत़े त्यामुळे तळोदा तालुक्यातील दुर्गम भागाची लोकसंख्या पाहता विजमीटर बसविण्याच्या कामांना अधिक गती देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आह़े हजारो लोकसंख्येचा ग्रामीण भाग असलेल्या तळोदा तालुक्यात विजमीटर बसविण्याबाबत अद्याप सुमार कार्यवाही झालेली दिसून येत़े शासनाने घर तेथे विजमिटर, आकडीमुक्त गाव अशा विविध संकल्पना राबविल्या आहेत़ परंतु जोर्पयत संपूर्ण दुर्गम भागात विजमिटर बसविण्यात येत नाही, ग्रामस्थाना आपल्या हक्काची विज उपलब्ध होणार नाही तोर्पयत विजचोरी कमी होणार कशी असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आह़े सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शासनाकडूनच कमी विजमिटरचा पुरवठा होत असल्याने तसेच महावितरणकडे विजमिटर बसविण्यासाठी प्रशिक्षीत वायरमन तसेच इतर सहका:यांची कमतरता असल्याने विजमिटर बसविणे ढेपाळत चालले असल्याची चर्चा आह़े त्यामुळे अजून किती दिवस विजचोरी होणार व त्याचा भार सामान्य तसेच नियमित विजबिल भरणा:या ग्राहकांना सोसावा लागणार असा प्रश्न निर्माण होत आह़े अधिकारी तसेच कर्मचा:यांकडून आकडीमुक्त गाव करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असले तरी अकुशल वायरमन तसेच विजमिटरचा कमी पुरवठा यामुळे त्यांना कामात अनेक अडचणी येत आहेत़