कर्ज मंजुरीच्या बहाण्याने 29 हजारात फसवणूक
By admin | Published: January 11, 2017 11:23 PM2017-01-11T23:23:31+5:302017-01-11T23:23:31+5:30
नंदुरबार : दहा लाखांचे कर्ज मंजूर करून देतो म्हणून बनावट कंपनीच्या नावाने शहरातील एकाची 29 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याची घटना नंदुरबारात घडली.
नंदुरबार : दहा लाखांचे कर्ज मंजूर करून देतो म्हणून बनावट कंपनीच्या नावाने शहरातील एकाची 29 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याची घटना नंदुरबारात घडली. याप्रकरणी हरियाणा व दिल्ली येथील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबारातील कापड दुकान व्यापारी कुमारलाल भगवानदास टिलाणी यांना एका बनावट फायनान्स कंपनीने फसविले. ग्लोबल फायनान्स गव्हरमेंट अॅफव्हेड पर्सनल लोन नावाच्या कंपनीने 72 तासात लोन मंजूर म्हणून जाहिरात प्रसिद्ध केली. कंपनीच्या नावावर प्रिन्स मेहता, अॅड.जयबिरसिंग, वेदप्रकाश, सुनील कुमार यांनी कुमारलाल टिलाणी यांच्याशी 10 ते 25 नोव्हेंबर 2016 या दरम्यान मोबाईलवर संपर्क साधला. दहा लाखांचे कर्ज मंजूर करून देतो म्हणून अमिष दाखविले. त्यासाठी टॅक्स, स्टॅम्प पेपर, बॉन्ड व आरटीजीएस व एनईएफटी करण्यासाठी वेळोवेळी 29 हजार 500 रुपये भरून घेतले. कंपनीचा पत्ता प्रितमपुरा, दिल्ली असा दिला. परंतु टिलाणी यांनी त्या पत्त्यावर तपास केला असता त्या ठिकाणी अशी कोणतीही कंपनी अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी पोलिसात फिर्याद दिली.
टिलाणी यांच्या फिर्यादीवरून प्रिन्स मेहता रा.शिवा मार्केट दिल्ली, अॅड.जयबिरसिंग रा.हरियाणा, वेद प्रकाश रा. शिवामार्केट, दिल्ली व सुनीलकुमार रा.हरियाणा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.