नंदुरबारात आरोग्य शिबिरात 110 रूग्णांची मोफत तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:56 PM2018-05-29T12:56:49+5:302018-05-29T12:56:49+5:30
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 29 : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत शहरातील पटेल सजिर्कल व एन्डोस्कोपी सेंटरमध्ये मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आल़े रविवारी झालेल्या शिबिरात 110 रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली़
महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेंतर्गत केवळ जिल्हा सामान्य रूग्णालय आणि पटेल सजिर्कल व एन्डोस्कोपी येथेच शस्त्रक्रिया करण्यात येतात़ याअंतर्गत मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होत़े प्रसंगी डॉ़ विजय पटेल, डॉ़ प्रदीप सोनार, डॉ़ दक्षा पटेल यांनी रूग्णांची तपासणी करून निदान केल़े शिबिरात दारिद्रय रेषेखालील लाभार्थी व विविध स्तरातील लाभार्थी रूग्ण सहभागी झाले होत़े त्यांच्या तपासण्या करून औषधांचे वाटप करण्यात आल़े प्रसंगी डॉ़ विजय पटेल यांनी रूग्णांना मार्गदर्शन केल़े शिबिरातून विविध आजारांमुळे त्रस्त असलेल्या 20 रूग्णांवर तेथेच शस्त्रक्रिया झाल्या़