शुक्रवारची पहाट त्यांच्यासाठी ठरली होती जीवघेणी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:44 PM2019-08-11T12:44:00+5:302019-08-11T12:44:45+5:30
सुनील सोमवंशी । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शुक्रवारची पहाटे जाग आली ती घरात शिरलेल्या पाण्याने.. नेहमीप्रमाणे प}ी पहाटे ...
सुनील सोमवंशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शुक्रवारची पहाटे जाग आली ती घरात शिरलेल्या पाण्याने.. नेहमीप्रमाणे प}ी पहाटे उठली परंतु बेडवरुन पाय जमिनीला लागताच थंडगार पाण्याच्या स्पर्शाने ती घाबरली.. पायाला थंडगार काय लागते म्हणून तिने खाली पाहिले आणि घरात चोहीकडे पाणीच पाणी बघून ती घाबरली.. हा अनुभव होता शहादा येथील दिलीप आहेर यांचा.
बुधवारपासून सुरु झालेली पावसाची संततधार शुक्रवार्पयत सुरु होती. सलग सुमारे 36 तास झालेल्या या पावसाने संपूर्ण तालुक्यात हाहाकार माजवला. घरात पाणी शिरल्याचा अनुभव दिलीप आहेर यांनी ‘लोकमत’शी बोलतांना शेअर केला. दोंडाईचा रोडवर, सप्तशृंगी मंदिरासमोर दिलीप आहेर यांचे गॅरेज व त्यामागे घर आहे. दिलीप आहेर हे प}ी जया व मुलगा निलेशसोबत रहातात. त्यांच्या शेजारीच त्यांची विधवा भावजयी शैला ह्या आपल्या अंजली व रूना या दोन मुलींसह राहतात. शुक्रवारी दोन्ही कुटुंब आपापल्या घरात झोपलेले असताना पहाटे चार वाजता जयाबाई यांना जाग आली आणि संपूर्ण घरात पाणीच पाणी बघून त्यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी लगेच पती व मुलाला उठवून परिस्थितीची जाणीव करुन दिली. शेजारी रहाणा:या शैला यांनाही पहाटे साडेचार वाजता घरात पाणी शिरल्याचे समजताच त्यांनी मुलींना उठवले व सामानाची बांधाबांध सुरु केली. दोन्ही घरात मिनिटागणिक पाण्याची पातळी वाढत असल्याने काळजी पसरली. हिंमत धरत सर्वानी आलेल्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी सामानाची आवरसावर केली. धान्याच्या कोठीत पाणी गेल्याने धान्य ओले झाले होते, कपडे ओले झाले होते. गँरेजमध्येही मशिनरी पाण्यात बुडाली. जुना मोहिदा रोडवरील पाटचारीचे पाणी परिसरात पसरल्यामुळे तेच पाणी या दोन्ही घरात शिरले होते. दुपारी 12 वाजता पाऊस थांबल्यावर घरातील पाणी ओसरण्यास सुरवात झाली. रात्री आठ वाजता घरातील सर्व पाणी ओसरले पण घरात मोठय़ा प्रमाणात गाळ साचल्याने रात्री झोपणेही अशक्य झाल्याने दुस:या मजल्यावर व्यवस्था करण्यात आली. घरात सुमारे दोन फुट पाणी असूनही एकाही शासकीय अधिकारी किंवा पालिकेकडून दखल घेतली गेली नसल्याचे दिलीप आहेर यांनी सांगितले. शनिवारी सकाळी घरातील गाळ काढण्यात आला. सुदैवाने पाऊस थांबल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी दोन दिवस दोन्ही परिवारातील सदस्यांचा जीव टांगणीला लागल्याचे अंजलीने सांगितले.