परिक्षेसाठी कॉम्प्युटर सेंटरकडून टॉवरला इंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 12:14 PM2019-12-05T12:14:28+5:302019-12-05T12:14:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील दुरसंचारच्या अनियमित सेवेचा अतिमहत्वाच्या कामांवरही विपरित परिणाम होत आहे. मोलगी येथे एमकेसीएलच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुर्गम भागातील दुरसंचारच्या अनियमित सेवेचा अतिमहत्वाच्या कामांवरही विपरित परिणाम होत आहे. मोलगी येथे एमकेसीएलच्या आॅनलाईन एमएस-सीआयटी परिक्षेसाठी नियमित सेवेची गरज होती. परंतु टॉवरच बंद असल्याने अडथळा आला. यावर मात कॉम्प्युटर सेंटर चालकानेच स्वत: डिझेल उपलब्ध करुन देत टॉवर सुरू केला.
समस्यांच्या दृष्टीने दुर्गम भाग पाचवीला पुजलेलाच. पाठपुरावा करुनही समस्या न सुटणाऱ्या घटकांमध्ये धडगाव व मोलगी भागातील नागरिकांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. प्रशासकीय यंत्रणेत मोठी उदासिनता दिसून येते. त्यामुळे या दुर्गम भागातील या समस्या सुटण्याऐवजी त्यात दुपटीने भर पडत आहे. मोलगी भागातील मोलगीसह जमाना, सरी, बेली येथील बीएसएनएलचे चारही टॉवर वारंवार बंद पडत आहे. नियमित सेवा मिळत नसल्याने त्या भागातील अनेक प्रशासकीय आॅनलाईन कामे पूर्ण होत नाही. नागरिकांची नियोजित कामे वेळेवर व अपेक्षेनुसार होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावाच लागत आहेत. एवढेच नव्हे तर एकाच कामासाठी त्यांना वारंवार चकरा माराव्या लागत आहे. यातून त्यांना आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे. नागरिकांचा वाढता त्रास व बसणारा भूर्दंड टाळण्यासाठी दुरसंचारकडे वारंवार पाठपुरावा करुनही या समस्या सुटल्या नाही. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
मोलगी येथे महाराष्टÑ नॉलेज कॉर्पोरेशनमार्फत मॉडर्न कॉम्प्युटर इन्स्टिट्युट हे कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. हे प्रशिक्षण केंद्र दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांना सोयीचे ठरत असल्यामुळे तेथे अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्यांची एमएस-सीआयटी परिक्षेसाठी ४ डिसेंबर ही नियोजित तारिख महाराष्टÑ नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ठरवून देण्यात आली होती. संस्थेकडून देण्यात आलेली ही तारिख कदापी बदलता येत नाही, त्यामुळे मोलगी येथील कॉम्प्युटर केंद्र चालकाच्या अडचणी वाढल्या.
नियोजित वेळेवर आॅनलाईन परिक्षा घेता आल्या नसल्यास महाराष्टÑ नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडकडून त्या-त्या कॉम्प्युटर सेंटरला असमर्थ सेंटर म्हणून घोषीत करण्यात येते. त्यानंतर केंद्राला दिलेली प्रशिक्षणाची जबाबदारी कुठल्याही तक्रारी तथा समस्या विचारात न घेता काढून घेतली जाते. ही कारवाई टाळण्यासाठी मोलगी येथील मॉडर्न कॉम्प्युटर इन्स्टिट्युटच्या संचालकाला नियोजित परिक्षा वेळेतच पार पाडण्यासाठी धावपळ करावी लागली.
आॅनलाईन परिक्षा घेण्यासाठी मोबाईल सेवा सुरळीत होणे आवश्यक असते. परंतु मोलगी येथील दुरसंचारचा टॉवरच बंद असल्यामुळे केंद्र संचालकासमोर मोठी अडचण निर्माण झाली. महामंडळाची कारवाई टाळण्यासाठी त्याने स्व:खर्चाने डिझेल भरुन देत बंद टॉवर सुरू केला. या इंधनातून टॉवर सुरू झाल्याने परिक्षा पार पडली. परिक्षा संपताच इंधन संपल्याने टॉवरही बंद पडला. त्यामुळे कॉम्प्युटर केंद्र संचालकावरील कारवाई टळली. परंतु नागरिकांच्या समस्या काही तासातच पुन्हा समस्या सुरू झाल्या.
आजचे विद्यार्थी हेच देशाचे भावी जबाबदार नागरिक आहे. त्यामुळे त्यांच्या वाटचालीत कुठलाही अडथळा येणार नाही. याची प्रत्येक यंत्रणेकडून घेतली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होतांनाच मोलगी अशी परिस्थिती दिसून आली. त्यामुळे स्वतंत्र भारतातील विद्यार्थ्यांचे यापेक्षा वेगळे दुर्दैव काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या वाटचालीत आड येणारी ही बाब विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसाठी देखील मोठी शोकांतिका असल्याचे म्हटले जात आहे.
४मोलगी केंद्रामार्फत एमएस-सीआयटीची आॅनलाईन परिक्षा घेण्यासाठी आजपर्यंत चार वेळा अशी परिस्थिती उद्भवली. परिक्षा न झाल्यास परिक्षार्थींना पुन्हा काही महिने थांबावे लागत असून परिक्षार्थींचा वेळ व आर्थिक खर्च सहन करावा लागतो. परंतु विद्यार्थ्यांवर अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी दरवेळेस केंद्र संचालकामार्फत काळजी घेतली जात असल्याने परिक्षा सुरळीत पार पडत आहे.
४मोबाईल परिक्षेत्रच मिळत नसल्याने नर्मदा काठावरील नागरिकांसह पायी येणाºया नागरिकांची प्रशासकीय कामे होत नाही. त्यात पोस्ट विभाग, बॅँक, दवाखाना, शिक्षक, अंगणवाडी सेविकांची आॅनलाईन कामे होत नाही. त्यामुळे या घटकातील व्यक्तींना अडचणी येत आहे.