रानपिंगळ्याच्या शोधासाठी निधीची आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 10:53 AM2018-09-04T10:53:06+5:302018-09-04T10:53:12+5:30

Fundraising for search of rowing | रानपिंगळ्याच्या शोधासाठी निधीची आडकाठी

रानपिंगळ्याच्या शोधासाठी निधीची आडकाठी

Next

भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : 113 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर तळोदा वनक्षेत्रात 2006 साली रानपिंगळा हा दुर्मिळ पक्षी दिसून आला होता़ यानंतर घुबड प्रजातीतील राखाडी रंगाचा रानपिंगळा अधूनमधून दिसून येत असल्याच्या चर्चा रंगत आहेत़ परंतू या चर्चाचा मागोवा घेत रानपिंगळ्याच्या प्रत्यक्ष शोधकार्याची आवश्यकता असताना वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी मात्र निधीची आडकाठी लावत आहेत़ 
तब्बल 9 हजार 800 हेक्टरपेक्षा अधिक वनक्षेत्राचा समावेश तळोदा तालुक्यात आह़े सातपुडय़ातील  सोजरबार, गो:यामाळ, अमोनी, लाखापूर, वाल्हेरी व कालीबेल अशा विस्तीर्ण भूभागावर हे वनक्षेत्र आह़े बिबट, हरीण, अस्वल  या प्राण्यांसह पक्षीवैविध्य असे या वनाचे वैशिष्टय़ आह़े येत्या ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात विणीच्या हंगामात परदेशातून शेकडो पक्षी येथे येत असल्याने महत्त्वपूर्ण ठरणा:या या वनक्षेत्राच्या विकासाला चालना देण्याचे कार्य गेल्या 10 वर्षात यथातथाच झाले आह़े परिणामी परदेशी पक्षी येण्याचे कमी होऊन स्थानिक पक्षीही येथून बाहेर पडू लागले आहेत़ गेल्या काही दिवसांपासून या भागात फॉरेस्ट आऊलेट अर्थात रानपिंगळा संचार करत असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़े यात रात्रीच्यावेळी या पक्ष्याचा आवाज येत असल्याचे स्थानिक आदिवासी बांधवांचे म्हणणे आह़े हा आवाज रेकॉर्ड करुन त्याचे संकलन करण्याची आवश्यकता आह़े पक्षी अभ्यासक आणि पक्षीतज्ञ यांना अभ्यासासाठी आवाज महत्त्वपूर्ण दुवा ठरणार असतानाही वनविभाग ठोस  निर्णय घेत नसल्याने रानपिंगळा पूर्णपणे नामशेष होण्याची अधिक शक्यता आह़े 
एकीकडे रानपिंगळ्यासारख्या अत्यंत दुर्मिळ अशा पक्ष्याबाबतची अनास्था दिसून येत असताना खाणावळ सुरू करून गिधाडांचे संवर्धन करण्याची वनविभागाची योजनाही बासनात गुंडाळली गेली आह़े धुळे येथील वनविभागाच्या वरिष्ठ अधिका:यांनी या योजनेला हिरवा कंदीलच न दाखवल्याने गिधाडांच्या अन्नाला ब्रेक लागला़ याबाबत ठोस निर्णय घेण्यास सक्षम अधिका:यांची नियुक्ती करण्याची अपेक्षा पक्षीमित्रांची आह़े 2006 साली कोठार ता़ तळोदा वनक्षेत्रात रानपिंगळा दिसून आल्यानंतर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या चार जणांच्या पथकाने पाहणी करून रानपिंगळा असल्याचे शिक्कामोर्तब केले होत़े या घटनेला 12 वर्ष उलटून गेल्यानंतर अतीदुर्मिळ अशा रानपिंगळ्याच्या संवर्धनासाठी उपाययोजनांची गरज असतानाही आजवर कारवाई झाली नाही़ याउलट वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढल्याने या पक्ष्यांनी नजीकच्या गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यात असलेल्या पूर्णा पक्षी अभयारण्यात स्थलांतर केल्याचा अहवाल मुंबई येथील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने दिला होता़ यानंतरही पक्षी संवर्धनाबाबतची उदासिनता कमी झालेली नाही़  
साधारण 23 सेंटीमीटर आकाराचा घुबडवर्गीय रानपिंगळा हा रात्रीच दिसत असल्याने त्याचे सव्रेक्षण करण्यासाठी पाहिजे असलेल्या कोणत्याही साधनांची पूर्तता वनविभागाने केलेली नाही़ यात प्रामुख्याने नाईट व्हिजन दुर्बिणींचा समावेश होता़ याचसोबत तज्ञ आणि प्रशिक्षित पक्षीमित्रांना बोलावून रानपिंगळ्याची गणनाही आजवर केलेली नाही़ पर्यावरण साखळीतील महत्त्वा दुवा असलेला रानपिंगळा हा शेतकरी आणि वनक्षेत्रासाठी सर्वाधिक लाभदायक आह़े वनक्षेत्र आणि शेतशिवारात झपाटय़ाने वाढणा:या उंदरांवर नियंत्रण मिळवण्यात घुबडवर्गीय रानपिंगळा मदतगार ठरतो़ एका रात्रीतून सात ते आठ उंदरं सहजपणे खाऊन टाकत असल्याने उंदरांच्या संख्येवर नियंत्रण मिळवता येत़े यातून वनक्षेत्रातील बहुमूल्य झाडे आणि शेतातील पिकं सुस्थितीत राहतात़   
एखादा पक्षी नामशेष होण्यात त्याच्यासोबत जोडल्या गेलेल्या कपोलकल्पित कहाण्याही सहाय्यकारी ठरतात़ लोखंडाचे सोनं करणा:या परीसापासून स्वत:ची अंडी फोडणारा पक्षी, गुप्तधनाची अचूक जागा शोधणारा किंवा मग सट्टय़ाचे आकडे काढून देणारा पक्षी अशी ओळख करून दिली गेल्याने गैरसमज वाढून त्यांना पकडणे आणि शिकार होणे असे प्रकार झाल्याने तळोदा वनक्षेत्रातील अनमोल ठेवा नष्ट झाल्याचे सर्वश्रुत आह़े गेल्या काळात या भागात हौशींकडून या पक्ष्याचा शोध घेण्याचे प्रकार झाल्याचे उघड होऊनही वनविभागाने कारवाई केलेली नाही़ 
 

Web Title: Fundraising for search of rowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.