जिल्ह्यात ५३ जणांवर कोविड-१९ नुसार अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:29 PM2020-07-27T12:29:58+5:302020-07-27T12:30:05+5:30

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रत्येक धर्मशास्त्रात अंत्यविधीला महत्वाचे स्थान आहे. परंपरेप्रमाणे अंत्यविधी व्हावा हा प्रत्येकाचा ...

Funeral of 53 persons in the district as per Kovid-19 | जिल्ह्यात ५३ जणांवर कोविड-१९ नुसार अंत्यसंस्कार

जिल्ह्यात ५३ जणांवर कोविड-१९ नुसार अंत्यसंस्कार

Next

मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रत्येक धर्मशास्त्रात अंत्यविधीला महत्वाचे स्थान आहे. परंपरेप्रमाणे अंत्यविधी व्हावा हा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. परंतु कोरोनामुळे अनेकांच्या नशीबी ते देखील आले नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील ५३ जणांच्या नशीबी ते नव्हते हे स्पष्ट झाले आहे. अर्थात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील ५३ जणांवर पारंपारिक ऐवजी कोविड-१९ च्या मार्गदर्शक नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यातील २४ जण पॉझिटिव्ह असल्याचे रेकॉर्डवर आहे.
कोरोनाने अनेकांचे होत्याचे नव्हते केले आहे. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर काहींना आर्थिक व मानसिक फटका सहन करावा लागलाा आहे. जिल्ह्यात पहिला रुग्ण १८ एप्रिल रोजी आढळून आला होता. तेंव्हापासून आतापर्यंत अर्थात २६ जुलैपर्यंत संशयीत व पॉझिटिव्ह अशा ५३ जणांना जीव गमवावा लागला आहे. परंतु प्रत्यक्षात २४ जणांचाच अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे रेकॉर्डवर नोंद आहे.
जिल्हा रुग्णालयात कोविडची प्राथमिक लक्षणे असलेल्यांवर उपचार करण्यात आले. त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता जिल्हा प्रशासनानेच कोविड-१९ च्या नियमावलीनुसार अंत्यसंस्कार केले आहेत. त्यासाठी आरोग्य विभाग, नगरपालिका विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या जबाबदारी पार पाडली आहे. या ५३ पैकी ३४ जणांवर नंदुरबारातील त्या त्या धर्माच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यासाठी नंदुरबार पालिकेचे मोठे सहकार्य मिळत आहे.


२० एप्रिल ते २६ जुलै...
1कोरोनामुळे जिल्ह्यात पहिल्या मृत्यूची नोंद २० एप्रिल रोजी करण्यात आली होती. या मृतदेहावर नंदुरबारात अंत्यसंस्कार करण्यात आले.
2कोरोनाची लक्षणे असलेले परंतु स्वॅबचा अहवाल न आलेल्यांचेही दक्षता म्हणून कोविड-१९ नुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरुवातीला त्यांच्या शहरात किंवा गावी मृतदेह नेण्यात येत होता.
3दिड महिन्यापासून कोविडग्रस्त किंवा संशयीताचा मृतदेह हा गावी न नेता नंदुरबारातील स्मशानभूमीतच सर्व नियम पाळून अंत्यसंस्कार केले जाऊ लागले आहे.


गेल्या दीड महिन्यापासून संशयीत किंवा पॉझिटिव्ह अशा सर्वांचे अंत्यसंस्कार नंदुरबारातच करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार नंदुरबारातील जुन्या स्मशानभुमीत अग्निसंस्कार तर त्या त्या धर्माच्या दफनभुमीत दफनविधी केला जात आहे. लागलीच परिसर सॅनिटाईज केला जात असतो. यासाठी पालिकेचे दोन कोरोनायोद्धा काम करीत आहेत. त्यांना उचीत मानधनही दिले जात आहे. पालिकेकडून सेवाधर्म म्हणून सर्व बाबी त्यासाठी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.


कोरोना संशयीत किंवा पॉझिटिव्ह रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्यावर कोविड-१९ नुसार त्या मृतदेहावर सर्व प्रक्रिया पार पाडली जाते. जिल्हा रुग्णालय, आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडावी लागते. दोन नातेवाईकांना उपस्थित राहता येते. काहीवेळा नातेवाईकांना अंत्यदर्शनाची सोय केली जाते. त्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाते. -डॉ.आर.ए.थोरात, न्यायवैद्यक अधिकारी, नंदुरबार.


नंदुरबार मेड लिक
फ्रूफ बॉडी बॅग...
च् मृतदेह अंत्यसंस्काराला पाठविण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. आधी मृतदेहाला आवश्यक ते केमिकल लावले जाते. नंतर ते एका बॅगेत पॅक केले जाते. संबधीत बॅग ही मुंबई, दिल्ली येथून मागवावी लागते. एका बॅगला दीड हजाराचा खर्च येतो. शिवाय वेळेवर उपलब्ध होत नाही.
च्ही बाब लक्षात घेता न्यायवैद्यक अधिकारी डॉ.आर.ए.थोरात यांनी स्थानिक ठिकाणीच अवघ्या हजार रुपयात बॅग बनवून घेतली आहे. एक बॅग पारदर्शी असते त्यावर पुन्हा दुसरी बॅग असते ती थोडी हेवी असते. यातून मृतदेहाचा चेहरा नातेवाईकांना पहाता येतो. पारंपारिक साधनांद्वारे या बॅगा तयार करण्यात आल्या आहेत.

Web Title: Funeral of 53 persons in the district as per Kovid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.