अतिवृष्टीच्या नुकसानीवर साडेसोळा कोटींची फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 12:01 PM2020-10-01T12:01:31+5:302020-10-01T12:01:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुलै ते आॅक्टोबर २०१९ मधील अतिवृष्टी व पूरामुळे शेतपिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या ...

Funk of Rs 16.5 crore on excess rain damage | अतिवृष्टीच्या नुकसानीवर साडेसोळा कोटींची फुंकर

अतिवृष्टीच्या नुकसानीवर साडेसोळा कोटींची फुंकर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जुलै ते आॅक्टोबर २०१९ मधील अतिवृष्टी व पूरामुळे शेतपिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या आणि पिकासाठी कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना एक हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यासाठी जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १६ कोटी ५६ लाख ६१ हजार ५०० रुपये प्राप्त झाले आहेत. दुसरा टप्पाही तेव्हढ्याच रक्कमेचा येणार आहे. अर्थात एकुण ३३ कोटी १३ लाख २३ हजार रुपये जिल्ह्याला मदतनिधी मिळणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील तहसीलदारांनी केलेल्या मागणीप्रमाणे प्रथम टप्प्यात ही रक्कम बीडीएस प्रणालीवर वितरीत करण्यात आली आहे. दुसºया टप्प्यात एवढीच रक्कम प्राप्त होणार आहे.
नंदुरबार तालुक्यासाठी चार कोटी ६९ लाख ३३ हजार ५००, नवापूर ५३ लाख ७१ हजार ५००, शहादा सहा कोटी ९९ लाख ५२ हजार ५००, तळोदा दोन कोटी ७६ लाख १२ हजार, अक्कलकुवा एक कोटी ३६ लाख चार हजार आणि अक्राणी तालुक्यासाठी ५४ लाख २८ हजार निधी प्राप्त झाला आहे.
ही मदत शेती किंवा बहुवार्षिक फळपिकाच्या नुकसानीकरीता ३३ टक्के अथवा त्याहून अधिक झालेल्या नुकसान झालेल्यांना अनुज्ञेय राहील. नुकसानीच्या पंचनाम्यानुसार आणि त्या त्या तालुक्यातील तहसीलदार यांनी दिलेल्या अहवालानुसार मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.
संबंधित बाधिताच्या बँक खात्यावर मदत जमा करण्यात येईल. कोणत्याही बाधितांना रोखीने मदतीचे वाटप करण्यात येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.

 

  • आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत नंदुरबार तालुक्यातील २८२ हेक्टर, नवापूर ३,९१८ हेक्टर, अक्कलकुवा २,५९९ हेक्टर, शहादा १,१९० हेक्टर, तळोदा १२५ हेक्टर आणि अक्राणी तालुक्यात ३,१२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात जिरायती व फळपिके सोडून इतर बागायती पिकांचा समावेश आहे. नुकसानीचा अहवाल कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला आहे.
  • सप्टेंबर महिन्यात झालेला सततचा पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ८,२३४ शेतकऱ्यांच्या शेतात ४,३६४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्राथमिक अहवालानुसार नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पंचनाम्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून लवकरच अंतिम अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे.
  • प्राथमिक अहवालानुसार नंदुरबार तालुक्यात १,१७० शेतकºयांचे ९८५ हेक्टर, नवापूर ५,१२३ शेतकºयांचे १,८२८ हेक्टर, अक्कलकुवा २१० शेतकºयांचे ६० हेक्टर, शहादा ३५१ शेतकºयांचे २६१ हेक्टर आणि अक्राणी तालुक्यात १,३८० शेतकºयांच्या १,२३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
  • नुकसानग्रस्तांना मदतीसाठी सात कोटी ७५ लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यात पावसामुळे जिल्ह्यातील २६ हजार ४६१ शेतकºयांकडील ११ हजार २४२ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
  •  

गेल्या वर्षाची नुकसानीची मदत प्राप्त झाली आहे. यंदाच्या अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे तातडीने आदेश दिले होते. त्यानुसार आॅगस्ट महिन्याचे झाले. आता सप्टेबर महिन्यातील नुकसानीचे पंचनामे झाले असून शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे.
-राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी.

 

Web Title: Funk of Rs 16.5 crore on excess rain damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.