गडदाणीला दोन बिबट्यांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 12:43 PM2020-12-22T12:43:13+5:302020-12-22T12:43:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर / विसरवाडी :  तालुक्यातील चिंचपाड्याच्या वनक्षेत्रातील गडदाणी जंगलात दोन बिबट्यांची निर्घुणपणे शिकार करण्यात आल्याचे आढळून ...

Gaddani hunts two leopards | गडदाणीला दोन बिबट्यांची शिकार

गडदाणीला दोन बिबट्यांची शिकार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर / विसरवाडी :  तालुक्यातील चिंचपाड्याच्या वनक्षेत्रातील गडदाणी जंगलात दोन बिबट्यांची निर्घुणपणे शिकार करण्यात आल्याचे आढळून आले. या वेळी मेलेल्या पशुंच्या मासमध्ये विषप्रयोग करुन बिबट्यांची शिकार करण्यात आल्याचा संशय वनविभागाला आहे. याप्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. शिकारीनंतर या दोन्ही बिबट्यांचे मोठे दात, मिश्या त्यांचे चारही पंजे कापून काढण्यात आलेले आहेत.
बिबट्याचे अवशेष दोन संशयित आरोपीचा घरात आढळून आले. या प्रकरणी अजूनही काही बिबट्यांची शिकार झाली आहे का? याचा शोध वनविभागाकडून केला जात आहे. त्यासाठी विशेष शोधमोहीम विसरवाडी पोलिसांच्या मदतीने राबवली जात आहे. द्वेष भावनेतून या दोन्ही बिबट्यांची शिकार केल्याचा संशय वन विभागाने व्यक्त केला आहे.
एक सात वर्षीय बिबट्या १५ दिवसापूर्वी मारून बिबट्याला जमिनीत पुरविण्यात आले होते. त्यांला रविवारी बाहेर काढले असता कुजलेल्या अवस्थेत सांगाडा मिळून आला. यासंदर्भात वनविभागाने चार संशयितांची धरपकड करण्यात आली आहे. त्यावर रविवारी घटनास्थळी पंचनामा करून अंतिम संस्कार करण्यात आले. संशयित आरोपीकडून चौकशी केली असता दुसरा बिबट्या मृतक अवस्थेत जमिनीत पुरला असल्याची माहिती समोर आली. या बिबट्याचे चारही पंजे तोडलेले दिसून आले. 
या बिबट्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाहेर काढून त्याचा पशुधन व महसूल कर्मचाऱ्यांच्या समक्ष पंचनामा करून अग्निदाग देण्यात आला.  तिसराही बिबट्या मेलेला असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. परंतु वनविभागाला तिसरा बिबट्या मिळून आला नाही. दोन बिबटे मेल्याची माहिती दिली आहे. याबाबत वन विभागाने शोध  मोहीम सुरू केली असून, त्यांचा मृत्यू नैसर्गिक झाला की, शिकाराने हे अजून कळू शकेल नाही, अशी माहिती वनअधिकारी आर.बी. पवार यांनी दिली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी शवविच्छेदन करून अहवाल आल्यावर निष्पण होईल असे सांगितले. यासंदर्भात काल सहा संशयित आरोपीची धरपकड करण्यात आली.
नवापूर तालुक्यातील गडदाणीच्या जंगलात बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. या बिबट्यांनी अनेक पशुधन फस्त केल्याची माहिती स्थानिकानी दिली. तसेच काही लोकांनी मेलेल्या पशुच्या मासमध्ये विषारी औषध टाकून बिबट्यांना मारण्यात  आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  यासंदर्भात उप वनसंरक्षक सुरेश कवटे, सहायक वनसंरक्षक डी.जी. पवार, वनक्षेत्रपाल चिंचपाडा आर.बी. पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पशुधन अधिकारी डॉ.योगेश गावीत, मंडळधिकारी बी.एन. सोनवणे, तलाठी जी.एस. तडवी, नवापूर, चिंचपाडा, शहादा, नंदुरबार वनविभागाचे ५० हून अधिक कर्मचारीवर्ग घटनास्थळी दाखल  होते. वन विभागाची जंगलात शोध मोहीम सुरू आहे. वन्य जीव, वन्य प्राण्यांचा सुरक्षिततेसाठी नवापूर तालुक्यातील नवापूर व चिंचपाडा वन विभागाने जंगलात गस्त घालण्याची गरज आहे.

Web Title: Gaddani hunts two leopards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.