बसमधल्या जागेसाठी विद्याथ्र्र्याचा जीवाशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:28 PM2019-06-27T12:28:39+5:302019-06-27T12:28:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शिक्षणासाठी तालुक्याच्या विविध भागातून शहरात येणारे विद्याथ्र्याचा परतीचा प्रवास जीवघेणा झाला असून जीवाची पर्वा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शिक्षणासाठी तालुक्याच्या विविध भागातून शहरात येणारे विद्याथ्र्याचा परतीचा प्रवास जीवघेणा झाला असून जीवाची पर्वा न करता विद्यार्थी बसमध्ये जागा मिळावी म्हणून चालत्या बसमागे धावत आहेत़ ‘अजाण’ विद्याथ्र्याच्या धावपळीकडे महामंडळाचे ‘सुजाण’ कर्मचारीही लक्ष देत नसल्याने समस्या गंभीर झाली आह़े
शहराच्या चौफेर असलेल्या गावांमधील सात हजार विद्यार्थी व विद्यार्थिनी दर दिवशी विविध बसेसद्वारे बसस्थानकावर येतात़ बसस्थानकातून पायीच शाळेत जावून सायंकाळी परतीच्या वेळी मात्र या विद्याथ्र्याची धावपळ अत्यंत जीवघेणी होत़े नेहरु चौक, महाराणा प्रताप पुतळा मार्गाने विद्यार्थी धावत बसस्थानकात आल्यानंतर फलाटावर लागणा:या प्रत्येक बसमध्ये चौकशी करतात़ दरम्यान एखादी बस सुटत असेल तर तिच्यामागे धावत सुटतात़ यातून गंभीर अपघात होण्याची स्थिती निर्माण होत असतानाही त्याकडे आगाराचे अधिकारी, पोलीस कर्मचारी किंवा शाळांचे शिक्षकही लक्ष देत नाहीत़ यात अनेक बसेस ह्या अचानक रद्द होत असल्याने दुस:या गावच्या बसेसचा शोध विद्याथ्र्याना घ्यावा लागतो़ यंदा शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने शाळा सुरु झाल्याने सायंकाळी पाचनंतर नंदुरबार बसस्थानकात येणा:या विद्याथ्र्याच्या सुरक्षेसाठी उपाययोजना नसल्याने त्यांचे जीव धोक्यात आहेत़ बहुतांश विद्यार्थी बस लागण्यापूर्वी आत बॅगा टाकण्यासाठी खिडकीला लटकतात़ बसमध्ये सहजासहजी प्रवेश मिळत नसेल तर खिडकीत स्वत:ला कोंबून घेत आत प्रवेश करत असल्याचे दृश्य येथे नित्याचे झाले आह़े नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात येणा:या सात हजार विद्याथ्र्याची नंदुरबार आगाराकडे आह़े विद्याथ्र्यानी मासिक पाससाठी अर्ज करुन पैसे भरुन प्राप्त केली आह़े गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या ही दीड हजाराने वाढली आह़े गतवर्षी ही संख्या 5 हजार 700 एवढी होती़ यंदा त्यात वाढ झाल्याने सुरक्षा उपायांची गरजही वाढली आह़े सायंकाळी सुटणा:या बसेससाठी धावपळ करणा:या विद्याथ्र्याना बसस्थानकात अचानक येणा:या खाजगी चारचाकी आणि दुचाकी वाहनांकडूनही धोका आह़े या वाहनांना प्रवेशाला बंदी असतानाही भरधाव वेगात वाहने येथे येतात़ यातील बरेच दुचाकीस्वार हे भरधाव वेगात धूमस्टाईलने मार्गक्रमण करतात़ टारगटांच्या या गर्दीमुळे महाविद्यालयीन युवती आणि विद्यार्थिनी कंटाळल्या आहेत़ टारगटांमध्ये बसस्थानक आणि परिसरात दरदिवशी होणा:या भांडणांमुळे विद्याथ्र्याची गर्दी होत आह़े सायंकाळी होणा:या या भीषण गर्दीचा फटका इतर प्रवाशांना बसत आह़े गेल्या आठवडय़ापासून बसस्थानकातून सुटणारी कलमाडी बस सातत्याने रद्द झाल्याने विद्यार्थी अंधार पडल्यानंतरही बसस्थानकात थांबून असल्याचे प्रकार घडले आहेत़