गणपती माझा नाचत आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 11:54 AM2019-09-03T11:54:09+5:302019-09-03T11:54:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पीक, पाण्याची उत्तम स्थिती, सर्वत्र उत्साह आणि चैतन्य यामुळे बाप्पांच्या स्वागतात भक्तांनी कुठेही कमतरता ...

Ganapati came to my dance | गणपती माझा नाचत आला

गणपती माझा नाचत आला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पीक, पाण्याची उत्तम स्थिती, सर्वत्र उत्साह आणि चैतन्य यामुळे बाप्पांच्या स्वागतात भक्तांनी कुठेही कमतरता न ठेवता जल्लोषात स्वागत केले. जिल्ह्यात 790 पेक्षा अधीक सार्वजनिक, खाजगी व एक गाव एक गणपती आणि घरगुती गणेश मंडळांनी सोमवारी गणेशमूर्तीची स्थापना केली. नंदुरबारातील मूर्ती कारखान्यांमध्ये दुपारी चार वाजेर्पयत मूर्ती घेवून जाण्यासाठी मंडळ पदाधिका:यांची लगबग कायम होती. दरम्यान, जिल्ह्यात चार टप्प्यात गणेश विसजर्न मिरवणूका काढण्यात येणार आहेत.
यंदा बळीराजा समाधानी असल्याच्या पाश्र्वभुमिवर गणरायाचे आगमन झाले आहे. अतिवृष्टी आणि संततधार पाऊस यामुळे आधी काहीसा निरुत्साह दिसून येत होता. परंतू स्वागतात भक्तांनी कसलीही कमतरता ठेवली नाही. मोठय़ा जल्लोषात, उत्साह आणि चैतन्याच्या वातावरणात बाप्पांचे स्वागत करण्यात आले. सकाळी सात वाजेपासूनच बाप्पांच्या स्थापनेसाठीची लगबग घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी दिसून येत होती. सायंकाळी पाच वाजेर्पयत नंदुरबारातील अनेक गणेश मंडळांच्या मिरवणुका सुरू होत्या.
790 पेक्षा अधीक मंडळे
जिल्हाभरात यंदा सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या स्थिर राहिली. गेल्यावर्षी 680 गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली होती. यंदा संख्या वाढून ती 790 र्पयत गेली आहे. एक गाव गणपतींची संख्या देखील गेल्यावर्षाच्या तुलनेतच कायम आहे.
अनेक मंडळांच्या मिरवणुका
नंदुरबारात सकाळपासूनच अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुकीने गणरायाला आणले. सायंकाळी पाच वाजेर्पयत मिरवणुका सुरूच होत्या. काही मंडळांनी स्थानिकस्तरावर आपल्या परिसरात तर काही मंडळांनी थेट गणेशमूर्ती कारखान्यापासून मंडळार्पयत मिरवणुका काढल्या. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला  होता.
मूर्ती घेवून जाणारे वाहने..
गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी शहराबाहेरील अनेक मंडळांनी विविध वाहनांचा वापर केला. काहींनी मोठय़ा ट्रक, काहींनी ट्रॅक्टर तर काहींनी जीप व इतर चारचाकी वाहनांचा वापर केल्याचे दिसून आले. शहरातील लहान मंडळे व घरगुती गणपती बसविणा:यांनी देखील कार, रिक्षा, मोटरसायकलीचा वापर केला. त्यामुळे अनेक भागातील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे दिवसभर मोठामारुती मंदीर, देसाई पेट्रोलपंप, स्टेटबँक परिसर या भागात वाहतूक    पोलिसांना उभे राहावे लागले. धौशा तकीया ते थेट मोठा मारुती मंदीर तसेच तेथून थेट स्टेट बँक र्पयत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.     
काही वाहनांच्या टपावरून देखील बाप्पांनी प्रवास केला. दिवसभर तसेच रात्री उशीरार्पयत हे चित्र दिसून येत होते. रविवार आणि सोमवार सलग सुटीचा दिवस असल्यामुळे    गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी गर्दी झाली होती. 
आरास आज खुल्या होणार
नंदुरबारातील 12 पेक्षा अधीक गणेश मंडळांनी मोठय़ा आरास तयार केल्या आहेत. भाविकांना पहाण्यासाठी या आरास मंगळवारपासून खुल्या होतील. जवळपास सर्वच मंडळांनी जनजागृतीपर विषय घेवून आरास सादर केल्या आहेत.
घरगुती गणपतीला साज करण्यासाठी लागणा:या वस्तूंनाही आज मोठी मागणी होती. थर्मोकॉलपासून तयार करण्यात आलेले मखर, विविध प्रकारच्या माळा,  विद्युत दिव्यांची माळ, चमकी, पताका यासह इतर साहित्याचा समावेश होता. त्यासाठी विविध भागात खास दुकाने थाटण्यात आली होती.

जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी सहा वाजेर्पयत 422 मंडळांतर्फे गणेशाची स्थापना करण्यात आली होती. यात 292 सार्वजनिक गणेश मंडळे, 71 खाजगी गणेश मंडळे, 69 एक गाव एक गणपती मंडळांचा समावेश होता. याशिवाय घरगुती मंडळांची संख्या वेगळी होती. नंदुरबारसह शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा येथे पोलिसांनी चोख बंदोबस्त तैणात केला होता. नंदुरबारात ठिकठिकाणी सायंकाळी उशीरार्पयत मिरवणुका सुरू होत्या. त्यामुळे बंदोबस्त कायम ठेवला गेला होता. 
 

Web Title: Ganapati came to my dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.