प्रकाशा येथे गणेश विसर्जन शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:36 AM2021-09-17T04:36:42+5:302021-09-17T04:36:42+5:30
प्रकाशा : प्रकाशा येथे पाचव्या व सातव्या दिवशीच गणेश विसर्जन केले जाते. पाचव्या दिवशी आठ गणेश मंडळांनी मूर्तींचे विसर्जन ...
प्रकाशा : प्रकाशा येथे पाचव्या व सातव्या दिवशीच गणेश विसर्जन केले जाते. पाचव्या दिवशी आठ गणेश मंडळांनी मूर्तींचे विसर्जन केले तर गुरुवारी गाव गणपती मंडळ व जय श्रीराम गणेश मंडळाचे गणपती विसर्जन शांततेत पार पाडले.
दरवर्षी तापी नदी पुलावर व तापी घाटावरून शेकडो गणेशमूर्ती विसर्जनासाठी येतात. मात्र, या वर्षी पाण्यात वाहून जाण्याचे कारण दाखवत पोलिसांनी तेथे गणेश विसर्जनाला बंदी केली आहे. म्हणून सर्व गणेशमूर्ती गौतमेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये विसर्जनासाठी येत आहेत. या वेळी घरगुती गणेशदेखील भाविकांनी डोक्यावर, लॉरीवर, दुचाकीवरून नदीकाठावर विसर्जनासाठी आणले होते. याप्रसंगी मंडळांनी साध्या पद्धतीने रामनामाचा जप करीत गणेश विसर्जन केले.
दरम्यान, गावातील चौधरी गणेश मंडळाच्या ‘श्रीं’चे मुलींनी विसर्जन केले. याप्रसंगी लेजीम व गरबा खेळत गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.