गुरांची अवैैध वाहतूक करणारे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 11:25 AM2017-09-01T11:25:57+5:302017-09-01T11:26:06+5:30
सहा संशयित ताब्यात : दुर्गम भागातील मोलगी ते साकलीउमर दरम्यान कारवाई
ऑनलाईन लोकमत
1 सप्टेंबर
मोलगी : पिकअप वाहनात गुरांना अमानुषपद्धतीने कोंबून त्यांची अवैैध वाहतूक करणा:या सहा संशयित आरोपींना मोलगी पोलीसांनी ताब्यात घेतले आह़े गुरूवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली होती़
मोलगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडीतराव सोनवणे यांना दोन वाहनांमधून गुरे वाहून नेली जात असल्याची माहिती मिळाली होती़ या माहितीनुसार पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दिपक बागुल, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोतीलाल घमंडे, सुनील बागुल यांच्यासह कर्मचा:यांनी बुधवारी रात्रीपासून अक्कलकुवा-मोलगी रस्त्यावर साकलीउमर गावाजवळ बॅरीकेटींग करत गस्त सुरू केली होती़ यादरम्यान गुरूवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास पिंपळखुटा गावाकडून एमएच 11 टी-7326 या पिकअप वाहनात अमानुषपणे गायी बांधूून आणत असल्याचे दिसून आल़े हे पिकअप वाहन थांबवून पोलीस कर्मचा:यांनी सहा संशयितांना ताब्यात घेतल़े पोलीसांनी दोन ते पाच वर्ष वयाच्या 40 हजार रूपये किंमतीच्या आठ गायी आणि एक लाख 50 हजार रूपये किमतीचे चारचाकी पिकअप वाहन असा एक लाख 90 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन संशयितांना ताब्यात घेण्यात आल़े
याबाबत पोलीस नाईक कल्पेश लक्ष्मण कर्णकार यांनी मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ताब्यात घेण्यात आलेले संजय कागडय़ा वसावे रा़ मोलगी, केत्या दिवाल्या वळवी रा़ जांगठी, पारशी मुंगा वळवी रा़ धनखेडी यांच्यासह तिघांना ताब्यात घेण्यात आल़े या सर्व सहा संशयितांना सात दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती केली होती़ त्यानुसार कारवाई झाल्याची माहिती देण्यात आली आह़े