हरभरा विकला आता पैशांसाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:56 PM2018-06-07T12:56:16+5:302018-06-07T12:56:16+5:30
नाफेडचे खरेदी केंद्र बंद : 273 नोंदणीकृत शेतक:यांच्या हरभ:याची खरेदी बाकी
नंदुरबार : 4 हजार 400 रूपये हमीभाव देत हरभरा खरेदी करणा:या शासनाने दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील 862 शेतक:यांना 1 रूपयाही दिलेला नाही़ घाम गाळून पिकवलेल्या हरभ:याची रक्कम मिळावी म्हणून शेतकरी सध्या वणवण करत आहेत़ यात 273 शेतक:यांची नोंदणी होऊनही त्यांचा हरभरा खरेदी केला गेला नव्हता़ या शेतक:यांना शासन निर्णयानुसार प्रतिक्विंटल 1 हजार रूपये देण्याची घोषणा झाली असली तरी बुधवारी खरेदी केंद्राला टाळे असल्याने शेतकरी परत गेले होत़े
नंदुरबारातील खरेदी केंद्रावर 29 मेपासून खरेदी बंद झाल्याने शेतकरी मोठय़ा संकटात सापडले आहेत़ गेल्या वर्षात रब्बी हंगामात जिल्ह्याच्या विविध भागात 21 हजार हेक्टर क्षेत्रात हरभरा पेरणी करण्यात आली होती़ या हरभ:याला शासनाने साडेचार हजार रुपये हमीभाव दिल्याने शेतक:यांनी नाराजी व्यक्त केली होती़ यातच 10 एप्रिलपासून नाफेडच्या खरेदी केंद्राद्वारे हरभरा खरेदी सुरू करण्यात आली़ तत्पूर्वी शेतक:यांच्या नोंदण्या केल्या गेल्या़ शेतक:यांनी या खरेदी केंद्रांवर विश्वास ठेवत हरभरा विक्री केला होता़ यातून 10 एप्रिल ते 29 मे या काळात जिल्ह्यात 8 हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली होती़ परंतू अचानक 29 मे रोजी हरभरा खरेदी बंद करण्याचा निर्णय झाला़ यामुळे आजअखेरीस 10 हजार क्विंटल हरभरा शेतक:यांच्या दारात पडून आह़े पावसाळा सुरू झाल्याने हा हरभरा खराब होण्याची भिती होती़ यावर मार्ग काढत, शासनाने 1 हजार देण्याचा निर्णय दिला असला तरी नोंदणी न होऊ शकलेल्या शेतक:यांना हरभरा विक्रीची परवानगी देण्याची अपेक्षा आह़े
बुधवारी शासनाच्या निर्णयाची माहिती मिळालेल्या नोंदणीकृत शेतक:यांनी याठिकाणी भेट देत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला़शासनाकडून हमी भावाने खरेदी करण्यात येणा:या नंदुरबार बाजार समितीतील नाफेडच्या केंद्रावर जिल्ह्यातील 862 शेतक:यांनी 10 एप्रिल ते 29 मे यादरम्यान हरभरा विक्री करण्याबाबत नोंदणी केली होती़ यातील 589 शेतक:यांचा हरभरा शासनाने खरेदी केला आह़े तर 273 शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आह़े 589 शेतक:यांकडून 8 हजार 629 क्विंटल हरभरा खरेदी झाली असतानाच 29 मे रोजी ही खरेदी बंद करण्यात आली होती़ पणन महासंघाकडून आलेल्या आदेशानंतर ही खरेदी बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े
हरभरा खरेदी झालेल्या 589 शेतक:यांना प्रती क्विंटल 4 हजार 400 रुपये दराने हरभ:याचे पैसे शासनाकडून देण्यात येणार होत़े परंतु दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही शासनाकडून शेतक:यांच्या खात्यात पैसे देण्यात आलेले नाहीत़ खात्यावर पैसे येत नसल्याने शेतकरी सातत्याने खरेदी केंद्रावरचे व्यवस्थापक आणि कर्मचारी यांना विचारणा करत आहेत़ शेतक:यांचे हरभ:याचे पैसे देण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस अशी घोषणा करण्यात आलेली नाही़ राज्यातील सर्वच केंद्रांतून खरेदी केलेल्या हरभ:याचे पेमेंट शेतक:यांना देण्याबाबत उदासीनता आह़े पणन महासंघाने हे पैसे मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े
शासनाने हमी भावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रे सुरू केली खरी; परंतु या केंद्रांना सुविधाच दिल्या नसल्याचेही गेल्या 2 महिन्यात सातत्याने समोर आले आह़े नोंदणी करूनही विक्री न करू शकलेल्या 273 पैकी किमान 150 शेतक:यांचा हरभरा निव्वळ ‘बारदान’ न मिळाल्याने पडून असल्याचे समोर आले होत़े दोन महिन्यात किमान 3 वेळा बारदानाअभावी खरेदी बंद झाली होती़ शासनाकडून बारदान खरेदीसाठी केंद्राला निधीच देण्यात येत नसल्याने हा प्रकार झाला होता़ विशेष म्हणजे 29 मे पूर्वीपासून बारदान नसल्याने खरेदी बंद होती़ अद्यापही बारदान नसल्याने अनेक शेतक:यांचा खरेदी केलेला हरभरा पडून आह़े