वर्षभरात गॅस सिलिंडर ३०० नी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:25+5:302021-07-19T04:20:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या काळात गॅसचे दर आणि गॅसची सबसिडी ही कमी होईल असे वाटत असताना मात्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या काळात गॅसचे दर आणि गॅसची सबसिडी ही कमी होईल असे वाटत असताना मात्र यात घट न होता दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या तुलनेत सबसिडीत बोटावर मोजण्याइतकीच घट झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. वाढणारे दर आणि कमी मिळणारी सबसिडी हा घरोघरी चिंतेचा आणि महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या वाढणाऱ्या दरामुळे घरातील महिनाभराचे महिलांचे बजेट पूर्णपणे कोलमडले असल्याचे चित्र समोर आले आहे.
शहरात चूलही
पेटविता येत नाही
गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी आमचे घरातील बजेट हे कोलमडले आहे. सांभाळून गॅस वापरण्याची वेळ आलेली आहे. कितीही काटकसर केली तरी किमान गॅस हा लागतोच, हे नाकारून चालणार नाही. गॅसचे दर वाढत असताना त्या तुलनेत सबसिडी मिळायला हवी.
श्रद्धा पाटील, नंदुरबार
गॅसची सबसिडी ही मिळत नसल्याने घराचे गणित चुकल्यासारखे वाटत आहे. एकीकडे गॅसचे दर वाढतात त्या तुलनेत सबसिडी मिळायला हवी. मात्र, ती सबसिडी मिळत नाही. ती योग्य प्रमाणात मिळाली तर गॅसच्या वाढणाऱ्या दराबाबत काही हरकत नाही. परंतु वस्तुस्थिती तशी नाही.
शोभा पाडवी, नंदुरबार