तळोदा येथील आमसभा वीज प्रश्नावर गाजली
By admin | Published: June 6, 2017 11:59 AM2017-06-06T11:59:47+5:302017-06-06T11:59:47+5:30
महावितरणच्या अधिका:यांची घेणार स्वतंत्र आढावा बैठक
Next
ऑनलाईन लोकमत
तळोदा,दि.6 - कमी अधिक दाबाचा वीज पुरवठा व शेतकरी कजर्माफीच्या विषयावर तळोदा येथे सोमवारी घेण्यात आलेली आमसभा चांगलीच गाजली़ महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत संबंधित अधिका:यांची स्ववंत्र आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार उदेसिंग पाडवी यांनी दिली़
तळोदा येथील वामनराव बापुजी मंगल कार्यालयात आमदार उदेसिंग पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याची आमसभा सकाळी 10.30 झाली़ महावितरणच्या गलथान कारभार तसेच कमी अधिक वीज दाबाची समस्या आदी विषयांवर आमसभा चांगलीच गाजली़
तळोदा तालुक्यातील सलसाडी गावाचे रोहित्र गेल्या चार महिन्यांपासून जळाले आह़े परंतु अजूनही नवीन रोहित्र बसविण्यात आलेले नाही़ शहरातील अनेक वीजेचे खांब नादुरुस्त आह़े त्यांची दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली़ आमसभेत ग्रामस्थांनी विविध विषयांबाबत समस्या मांडल्या़ यावर आमदार पाडवी यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुनील काळे यांना तत्काळ समस्यांवर उपाययोजना करण्याचे आदेश दिल़े सूत्रसंचालन मुकेश कापूरे यांनी केल़े तर आभार तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ़ किशोर सामुद्रे यांनी मानल़े