साडेआठ हजार जलस्त्रोतांचे जिओ टॅगींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:53 AM2019-08-28T11:53:58+5:302019-08-28T11:54:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील 8,644 पाणी स्त्रोतांचे जिओ टॅगींग करण्यात आले आहे. एका क्लिकवर कुठले पाणी स्त्रोत ...
ल कमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 8,644 पाणी स्त्रोतांचे जिओ टॅगींग करण्यात आले आहे. एका क्लिकवर कुठले पाणी स्त्रोत कुठे आहे, त्या पाण्याची तपासणी कधी झाली होती ही माहिती मिळू शकते. दरम्यान, पावसाळ्याच्या पाश्र्वभुमीवर या जलस्त्रोतांच्या जैवीक व रासायनिक अशा 11 हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. जिओ टॅगींग नंतर आता पाण्याच्या तपासणीत देखील जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्याची भौगोलिक रचना पहाता तीन तालुक्यांमधील गाव व पाडय़ांमध्ये पाणी पुरवठा योजना करण्यास अडचणी येतात. त्यामुळे विहिरी, कुपनलिका, हातपंप यांचाच उपयोग जलस्त्रोत म्हणून करावा लागतो. अशा जलस्त्रोतांची नियमित तपासणी होणे आवश्यक असते. या पाश्र्वभुमीवर पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे अशा स्त्रोतांची जैविक व रासायनिक तपासणी केली जाते. असे पाण्याचे स्त्रोत लागलीच कळावे यासाठी त्यांचे डिजीटायलेझशन अर्थात जिओ टॅगींग करण्यात आलेली आहे. हे काम अल्पावधीत आणि पुर्णपणे करणा:या जिल्ह्यांमध्ये नंदुरबार राज्यात याआधीच अव्वल ठरला आहे. डिजीटलायङोशन..जिल्ह्यात 591 ग्रामपंचायतीअसूनर् ैएकुण साडेआठ हजारापेक्षा अधीक पाणी स्त्रोत आहेत. ज्या ठिकाणाहून किंवा स्त्रोताहून गाव, पाडय़ातील नागरिक पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात ते अधिकृत स्त्रोत मानले जाते. त्यामुळे अशा स्त्रोतांची गाव, पाडे आणि द:याखो:यात जावून निश्चिती करण्यात आली. त्यांची एकुण संख्या 8,644 इतकी आहे. या सर्व स्त्रोतांचे अक्षांश, रेखांश निश्चिती करून त्याचे डिजीटलायङोशन करण्यात आले. अॅप व वेबसाईटद्वारे ते सहज पहाता येते. सर्वच पाण्याच्या स्त्रोतांचे डिजीटलायङोशन करणारी नंदुरबार जिल्हा परिषद ही राज्यात एकमेव ठरली आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्याच्या आत जिल्हा परिषदेचा शासनातर्फे गौरव करण्यात येणार आहे. सार्वजनिक विहिर, हातपंप, नळपाणीपुरवठा योजना या स्त्रोतांचा त्यात समावेश आहे. या सर्वेक्षणाच्या आधारेच कोणत्या गावात कोणत्या प्रकारचे स्त्रोत व ते कुठे आहेत व त्याचे प्रयोगशाळेत तपासणी केलेले निष्कर्ष व स्त्रोतांचे छायाचित्र आदी माहिती गुगलवर अपलोड केली जाणार आहेत. विशेष म्हणजे ही माहिती कायमस्वरूपी राहणार असल्याने गावातील जुन्या झालेल्या योजना, स्त्रोतांवर सांकेतांक रंगवून क्रमांक दिला गेला आहे. यात हंगामी, बारमाही व कायमस्वरूपी बंद असलेल्या स्त्रोतांचे सव्रेक्षण करण्यात आले आहे. इतकेच नाही तर स्त्रोतांपासून ते जलकुंभार्पयत गेलेल्या वितरण नलीकेचे सव्रेक्षण झाले आहे.तपासणीही मोठय़ा प्रमाणावरउपलब्ध स्त्रोतांमधील पाण्याचे जैविक व रासायनिक तपासणीत देखील मोठय़ा प्रमाणावर काम झाले आहे. 11 हजार तपासण्या आतार्पयत पुर्ण करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी दुषीत पाण्याचे अंश सापडले तेथे ग्रामपंचायतींना टीसीएल पावडर टाकणे व पाणी स्त्रोताच्या परिसरात स्वच्छता राखण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. 4जिल्ह्यातील पाणी स्त्रोतांमध्ये टीडीएसचे प्रमाण अत्यल्प दिसून आले आहे. नवापूर तालुक्यातील काही स्त्रोतांमध्ये हे प्रमाण आहे. पंरतु ते अल्प प्रमाणात असल्यामुळे पाणी पिण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 4नमुन्याचे अणुजैविक व रासायनिक वेिषण संबधीत तालुक्याच्या उपविभागीय प्रयोगशाळेत करण्यात येते. त्यामुळे वेळ व खर्च देखील वाचतो.4जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पहाता विहिरी आणि कुपनलिकांद्वारेच पाणी पुरवठा अधीक केला जातो.