माहेरून पाच लाख आणावेत म्हणून सासरच्यांकडून छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 05:02 PM2018-07-09T17:02:04+5:302018-07-09T17:02:09+5:30

To get five lakhs from mother-in-law persecution | माहेरून पाच लाख आणावेत म्हणून सासरच्यांकडून छळ

माहेरून पाच लाख आणावेत म्हणून सासरच्यांकडून छळ

googlenewsNext

नंदुरबार : माहेरून घर बांधण्यासाठी पाच लाख रूपये आणावेत यासाठी कलमाडी ता़ शहादा येथील माहेर आणि दलवाडे ता़ शिंदखेडा येथील सासर असलेल्या विवाहितेचा छळ केल्याची घटना घडली़ दलवाडे येथील सासरी व कलमाडी येथील माहेरी हा छळ करण्यात आला़   
वैैशाली गौतम कापुरे यांचा विवाह एप्रिल 2017 मध्ये गौतम कापुरे यांच्यासोबत झाला होता़ लगA झाल्यापासून ते 15 एप्रिल 2017 या दरम्यान पतीसह त्याच्या कुटूंबियांनी दलवाडे येथे सासरी घर बांधण्यासाठी माहेरून पाच लाख रूपये आणून देण्यासाठी छळ सुरू केला होता़ या दरम्यान   पती गौतम गुलाबराव कापुरे, सासरे गुलाबराव सुदाम कापुरे, नरोत्तम गुलाबराव कापुरे व निर्मलाबाई कापुरे सर्व रा़ दलवाडे ता़ शिंदखेडा यांनी वेळोवेळी छळ करत शरिरिक व मानसिक त्रास दिला़ या दरम्यान महिलेस मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ 
शनिवारी महिलेने शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवर पती गौतमसह सासू-सासरे आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वंतू गावीत करत आहेत़ 
 

Web Title: To get five lakhs from mother-in-law persecution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.