जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:42 PM2018-04-08T12:42:47+5:302018-04-08T12:42:47+5:30

शेकडो कर्मचारी सहभागी

Ghantanad agitation in front of Nandurbar Collectorate for old pension teachers | जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

googlenewsNext

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 8 : सर्व कर्मचा:यांना 1982-84 ची जुनी पेंशन योजना लागु करणे आणि ऑक्टोबर 2017 चा वारिष्ट वेतन श्रेणी व निवड श्रेणीपासुन शिक्षकांना वंचित ठेवणारा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानादसह धरणे आंदोलन करण्यात आले.
 31 आँक्टोबर 2005 नंतरच्या कर्मच्या:यांना जुनी पेन्शन योजना नाकारुन देशोधडीला लावण्याचे कट कारस्थान रचले गेले. एवढेच नाहीतर या नवीन पेंशन योजनेत मयत झालेल्या कर्मचा:यांना शासनाकडून आज रोजी कसलाही लाभ मिळालेला नाही. त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी जुनी पेंशन हक्क संघटन पुर्ण ताकदीनीशी या आंदोलनात उतरली आहे. तसेच विधीमंडळातील बहुतांश आमदार जुनी पेंशन योजना लागु करण्याचे आश्वासन देतात पण सभागृहात प्रभावीपणे मुद्दा कामांडला जात नाही? पाच वषार्साठी निवडुन आलेले लोकप्रतिनीधी आयुष्यभर पेंशन घेतात, तर आयुष्यभर सेवा करणा:या कर्मच्या:यांना किती पेंशन मिळणार? याचं उत्तर आज शासनाजवळही नाही. त्या विरुद्धसंघटनेतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले.
शिवाय शिक्षकांना 12/24 वषार्नंतर वरिष्ट वेतन श्रेणी व निवड श्रेणी लागु होत असताना मध्यंतरी 23 ऑक्टोबर 2017 ला एक शासननिर्णय काढुन शाळा अ श्रेणीत असेल तरच वरिष्ट वेतनश्रेणी अथवा निवडश्रेणी लागु होईल असा निर्णय घेतल्याने शिक्षकांच्या मनात असलेली खदखद या आंदोलनात दिसून आली. जर या निर्णयाची अंमलबजावणी करायची असेल तर मग आज ज्या शाळा अ श्रेणीत आहेत अशा शिक्षकांना 12 वर्ष पुर्ण होण्याअगोदरच शासन वरिष्ट वेतन श्रेणी आणि नाकारलेली जुनी पेंशन योजना लागु करणार का?असा सवाल संघटनेने केला आहे.
संघटनेचे राज्य सहकार्याध्यक्ष कुणाल पवार यांनी मार्गदर्शन       केले.  तुषार सोनवणे, संदिप रोकडे, अशोक बागले, शैलेंद्र रघुवंशी, गजानन मराठे, जागृती नानकर, तालुकाध्यक्ष प्रविण परदेशी, हिकमत बोडखे, अभिषेक काकड, पंकज होडगर, वाघंबर कदम, दयानंद जाधव, राहुल पवार, निलेश पाटील यांच्यासह कर्मचारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
 

Web Title: Ghantanad agitation in front of Nandurbar Collectorate for old pension teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.