स्ववर्गणीतून शाळेला सिलींडर व शेगडी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:58 AM2019-09-01T11:58:59+5:302019-09-01T11:59:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील कुढावद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी पोषण आहार शिजवण्यासाठी स्वत: वर्गणी करुन ...

Gift cylinders and grate to school | स्ववर्गणीतून शाळेला सिलींडर व शेगडी भेट

स्ववर्गणीतून शाळेला सिलींडर व शेगडी भेट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील कुढावद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी पोषण आहार शिजवण्यासाठी स्वत: वर्गणी करुन शाळेला नवीन गॅस कनेक्शन व शेगडी घेऊन दिली.
सरकारच्या मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दररोज दुपारी शाळेतील मुलांना सकस आहार देण्यात येतो. या योजनेअंतर्गत शाळेतील मुला-मुलींना पोषण आहारासाठी दररोज अन्न शिजविण्यासाठी सुके जळाऊ लाकूड वापरावे लागते. लाकूड नियमितपणे वेळेवर मिळत नसल्याने त्याचा त्रास परिसरातील सर्व प्राथमिक शाळांना होत असतो. जळाऊ लाकडाच्या अडचणीपासून कायमची सुटका मिळावी व आपल्या प्राथमिक शाळेतील मुला-मुलींना दररोज ताजे, सकस व चविष्ट आहार देता यावे या उद्देशाने कुढावद येथील शाळेतील मुख्याध्यापक राजेंद्र गोविंद पाटील यांनी शाळेतील इतर शिक्षक सुनील पाटोळे, कैलास चव्हाण व विठ्ठल कुरेची यांची मिटींग घेऊन जळाऊ लाकडाच्या समस्येवर कायमचा उपाय म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांनी आपापल्या परीने स्वत:च्या कमाईतून आर्थिक मदत करून आपल्या शाळेला शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी नवीन गॅस कनेक्शन व शेगडी घेऊन द्यावी ही कल्पना सुचवली. सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापकांच्या कल्पनेला एकमुखाने व सर्वसंमतीने मान्यता देऊन दुस:याच दिवशी नवीन गॅस कनेक्शन व शेगडी घेऊन शाळेला भेट देण्यात आली. अशा प्रकारची सामाजिक बांधिलकी जपत शिक्षकांनी राबविलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी शिक्षकांचे कौतुक केले.
 

Web Title: Gift cylinders and grate to school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.