पेटवून घेत तळोदा येथील विद्याथ्र्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:31 PM2018-08-18T12:31:36+5:302018-08-18T12:31:41+5:30

80 टक्के जळाला : तळोदा शहरातील घटनेने खळबळ

The girl's attempted suicide by shooting herself at Taloda | पेटवून घेत तळोदा येथील विद्याथ्र्याचा आत्महत्येचा प्रयत्न

पेटवून घेत तळोदा येथील विद्याथ्र्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Next

तळोदा : शहरातील नेमसुशील विद्यामंदिरात दहावीच्या वर्गात शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याने स्वत:ला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला़ 80 टक्के जळाल्याने त्याची प्रकृती गंभीर आह़े ही घटना शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास वळणरस्त्यालगत घडली़ 
जयदिप भरतसिंग राजपूत (15) असे आत्महत्येचा प्रयत्न करणा:या विद्याथ्र्याचे नाव असून त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला आधी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात व तेथून धुळे येथील खाजगी रूग्णालयात हलवण्यात आले आह़े  तळोदा पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास ब:हाणपूर-अंकलेश्वर वळणरस्त्यालगत मुख्तार शहा यांच्या वेल्डींग दुकानाच्या शेडमागे एकाने जाळून घेतल्याची माहिती देण्यात आली होती़ यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक यादवराव भदाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल देविदास विसपुते, पोलीस नाईक युवराज चव्हाण, कमलसिंग जाधव, दारासिंग गावीत, रामदास पावरा यांच्या पथकाने भेट देत पाहणी केली असता, जयदीप राजपूत हा 80 टक्के जळाल्याचे दिसून आल़े त्याला पोलीसांनी तात्काळ उपजिल्हा रूग्णालयात दाखल केल़े तेथून नंदुरबार व नंतर धुळे येथे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े त्याची प्रकृती गंभीर असून तळोदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आह़े या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आह़े 
जयदीप हा सायकलवरून या भागात आल्याचे सांगण्यात आले आह़े त्याने वळणरस्त्यालगतच्या एका पेट्रोलपंपावरून पेट्रोल घेत स्वत:ला पेटवून घेतल्याचे सांगण्यात आले आह़े वळणरस्त्यापासून 150 मीटर अंतरावर असलेला हा परिसर काहीसा निजर्न असल्याने पेट्रोल घेऊन जाणा:या जयदीपकडे कोणाचे लक्ष गेलेले नाही़ याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक यादव भदाणे हे या घटनेचा तपास करत आहेत़ 
 

Web Title: The girl's attempted suicide by shooting herself at Taloda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.