सातपुड्यातील होळीला ‘ग्लोबल’ स्वरूप देणार

By admin | Published: February 23, 2017 12:35 AM2017-02-23T00:35:55+5:302017-02-23T00:35:55+5:30

पर्यटन विभाग : जयकुमार रावल यांची माहिती

Give Holi to 'Global' in Satpura | सातपुड्यातील होळीला ‘ग्लोबल’ स्वरूप देणार

सातपुड्यातील होळीला ‘ग्लोबल’ स्वरूप देणार

Next

नंदुरबार : सातपुड्यातील आदिवासींच्या होळी उत्सवाला  ‘ग्लोबल’ स्वरूप देण्याचा निर्णय राज्याच्या पर्यटन विकास विभागाने घेतल्याची माहिती पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीची बुधवारी सभा झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना  रावल यांनी सांगितले की, पर्यटन विकास विभागाच्या वतीने जिल्ह्यातील अर्थात सातपुड्यातील होळी उत्सवाला देश आणि विदेशात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी १५ लाखांची तरतुद यंदा करण्यात आली असून व्हिडिओ आणि आॅडिओ क्लिपच्या माध्यमातून शक्य असेल तेथे या होळी उत्सवाची जाहिरात आणि उत्सवाची माहिती देण्याचा प्रयत्न राहणार आहे. पुढील वर्षापासून अधिक व्यापक स्वरूपात या उत्सवाला पर्यटन विभाग नावारूपास आणणार आहे. जास्तीत जास्त पर्यटक या भागात हा उत्सव पाहण्यासाठी येतील याचे नियोजन यंदाही करण्यात आल्याची माहिती रावल यांनी दिली.


५२ टक्के खर्च
जिल्हा नियोजन बैठकीत  विविध विभागांच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला आहे. मंजूर नियतव्ययाच्या तुलनेत केवळ ५२ टक्के निधी खर्च करण्यात आला असून मार्च अखेर सर्व निधी खर्च करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी सर्व            विभागप्रमुखांना दिले.

Web Title: Give Holi to 'Global' in Satpura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.