तलावडी येथे विद्याथ्र्याचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 03:08 PM2019-11-30T15:08:41+5:302019-11-30T15:08:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील तलावडी येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील विद्याथ्र्यानी तळोदा प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत ...

The glory of the student at Talawadi | तलावडी येथे विद्याथ्र्याचा गौरव

तलावडी येथे विद्याथ्र्याचा गौरव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा तालुक्यातील तलावडी येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील विद्याथ्र्यानी तळोदा प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवल़ आश्रमशाळेच्या 22 खेळाडूंची निवड विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी करण्यात आली आह़े
एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्पांतर्गत अनुदानित व शासकीय आश्रमशाळेच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा  शिर्वे ता़ तळोदा येथे घेण्यात आल्या़ स्पर्धेत तलावडी येथील अनुदानित आश्रमशाळेच्या खेळाडूंनी  नेत्रदीपक कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारात घवघवीत यश मिळवले आहे. 14 व 17 वर्षाआतील मुले व मुलींच्या संघाने चार क्रीडा प्रकारात यश प्राप्त केल़े खो-खो, रिले स्पर्धेत मुला-मुलींनी यश मिळवल़े सहा सांघिक खेळात देखिल शाळेचा संघ विजेता ठरला आहे. 16 वैयक्तिक क्रीडा प्रकारात मुलांनी यश मिळवल़े लांबउडी क्रीडा प्रकारात निलेश तडवी व भांगडी तडवी (प्रथम) उंच उडी-कलावती पाडवी (प्रथम), रविना तडवी (द्वितीय) लक्ष्मी वळवी (प्रथम) नेहा ठाकरे (द्वितीय), गोळाफेक - रमेश वसावे (द्वितीय), थाळीफेक - मिनाक्षी वळवी (द्वितीय) तर धावण्याच्या विविध प्रकारात धिरसिंग वळवी ,मिनाक्षी वळवी, नेहा ठाकरे, निलेश तडवी, मिनाक्षी वळवी, मीना वसावे यांनी यश मिळवल़े विद्याथ्र्याचे संस्थेचे अध्यक्ष सुहास नटावदकर, माध्यमिक मुख्याध्यापक प्रकाश साळुंके, प्राथमिक मुख्याध्यापक संजीवन पवार, अधिक्षक प्रविण वसावे यांनी कौतूक केले आह़े यशस्वी खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक अमोल पाटील, गंगाराम परमार व उदय गावीत यांचे मार्गदर्शन लाभल़े सर्व यशस्वी खेळाडूंचा आश्रमशाळेत शिक्षकांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला़
 

Web Title: The glory of the student at Talawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.