तळोदा तहसीलची शान कचऱ्यात पडून झाली स्मशान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:05 PM2020-01-28T12:05:26+5:302020-01-28T12:05:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिनोदा : ऐतिहासिक शहर असलेल्या तळोदा येथील जुन्या तहसील कार्यालयाची शान वाढवणारी तोफ थेट कचºयात फेकून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिनोदा : ऐतिहासिक शहर असलेल्या तळोदा येथील जुन्या तहसील कार्यालयाची शान वाढवणारी तोफ थेट कचºयात फेकून देत तिचे स्मशान करण्याचा घाट घातला जात आहे़ किमान ३०० वर्षांपूर्वी तहसील आवारातील तोफेची निर्मिती झाली असावी असा अंदाज आहे़
काही वर्षांपूर्वी तळोदा तहसील कार्यालय पाडून त्याठिकाणी नवीन प्रशासकीय संकुल उभारण्यात आले़ तळोदा तालुकावासियांसाठी हे संकुल भूषणावह आहे़ परंतू जुन्या तहसील कार्यालयाच्या आठवणींना उजाळा देणारी तोफ मात्र याठिकाणी ठेवली गेली नाही़ याऐवजी या तोफेला थेट कचºयात टाकून देत तिचा विसर पडल्याचा प्रकार प्रशासनाने केला आहे़ ही तोफ ब्रिटीशकालीन असल्याचे कागदोपत्री पुरावे असले तरी धातूची ही तोफ त्यापेक्षा अधिक काळ जुनी असावी असा अंदाज आहे़ परंतू प्रशासनाने याबाबत कोणतीही माहिती जाणून न घेताच तोफेला थेट फेकून दिल्याचा प्रकार प्रशासनाच्या असंवेदनशील वृत्तीचे दर्शन घडवणारे आहे़
नवीन प्रशासकीय संकुलाची निर्मिती होत असताना तोफेसाठी बांधकाम विभागाने जागा तयार केल्याची माहिती आहे़ परंतू प्रत्यक्षात इमारत बांधकामानंतर कोणत्याही प्रकारे कारवाई न करता ऐतिहासिक ठेव्याची मोडतोड केली आहे़