तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेचा उद्देश ठरला फोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:41 PM2018-02-11T12:41:21+5:302018-02-11T12:41:28+5:30
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शाळेला पुरेसा निधी उपलब्ध करून देवूनही स्थानिक अधिका:यांच्या उदासिनतेमुळे शाळेची अवस्था बिकट झाली आहे. विद्याथ्र्याना पुरेशा सुविधा नाहीतच, भोजन देणा:या संस्थेलाही वा:यावर सोडले आहे. कर्मचा:यांनाही मानधन दिले गेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे शिक्षण संचालक नंदकुमार यांनी संबधितांवर कारवाई करण्याच्या सुचना जि.प.सीईओंना यापूर्वीच दिल्या आहेत.
तोरणमाळ येथे सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शाळेची सुरुवात मोठा गाजावाजा करून करण्यात आली. तोरणमाळला जागा उपलब्ध नसल्यामुळे पहिल्या वर्षी ही शाळा नंदुरबारातील एकलव्य इंग्लिश मिडियम स्कुलच्या इमारतीत सुरू करण्यात आली. शाळा चालविण्यासाठी पुरेसा निधी देखील शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. असे असतांना संबधित अधिका:यांच्या उदासिनतेमुळे या शाळेचा उद्देशच सफऊ होऊ शकत नसल्याचे चित्र आहे. या शाळेच्या भोजन ठेकेदार बचत गटाला सहा महिन्यांपासून मानधनच मिळाले नसल्यामुळे त्यांनी भोजन देणे बंद करण्याचा इशारा दिला होता. त्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच राज्याच्या शिक्षण संचालकांनी तातडीने शिक्षण परिषदेचे पथक पाठवून चौकशी केली. चौकशीत अनेक बाबी उघड झाल्या होत्या.
गंभीर ठपका
चौकशी समितीने अनेक गंभीर बाबी आपल्या चौकशीत पुढे आणल्या. त्यात शाळेतील विद्याथ्र्यासाठी सोयी सुविधांसदर्भात कार्यवाहीच झाली नाही. पुरेसे अंथरूण व पांघरून व भोजनपट्टी देण्यात आल्या नाहीत. संपुर्ण हिवाळा निघून गेला तरी विद्याथ्र्याना ब्लँकेट पुरविण्यात आले नाहीत. विद्याथ्र्याना भोजन देणा:या बचतगटाला सुरुवातीपासून अर्थात सहा महिन्यांपासून मानधनच दिले गेले नाही. कंत्राटी कर्मचा:यांना अर्थात निवासी शाळा अधीक्षक, स्वयंपाकी यांनाही सुरुवातीपासून मानधनच दिले गेलेले नसल्याचा ठपका समितीने ठेवला आहे.
तातडीने सुविधा..
विद्याथ्र्याना तातडीने स्टेशनरी, बेड, गादी, कुशन व ब्लँकेट पुरवावे, भोजन व्यवस्था सुधारावी. पिण्याचे पाणी अर्थात जार नियमित मागवावे, परिसर स्वच्छता नियमित ठेवावी आदी सुविधा तातडीने पुरविण्याच्या सुचना या समितीने केल्या आहेत. शिवाय संबधित शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांनी कामात कुचराई केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याचेही प्रस्तावीत करण्यात आले आहे.
एस.टी.समितीकडूनही दखल
नुकतीच येवून गेलेल्या विधीमंडळ एस.टी. समितीने देखील या आंतरराष्ट्रीय शाळेच्या गैरव्यवस्थापनाबाबत दखल घेतली होती. समितीने काही बाबी नोंदवून घेतल्या असून विधीमंडळाला अहवाल सादर करतांना त्या नमुद करणार असल्याचे समजते.
संधीचा उपयोग व्हावा
राज्यातील पहिली आंतरराष्ट्रीय शाळा सुरू होण्याचा मान जिल्ह्याला मिळाला आहे. एक मॉडेल शाळा म्हणून या शाळेचे व्यवस्थापन ठेवल्यास आणि शाळा चालविल्यास राज्यात त्याची दखल घेतली जाणार आहे. त्यामुळे संधीचे सोने करण्याची संधी असतांना संबधीत अधिका:यांच्या उदासिनतेमुळे मात्र ही संधी दुरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीच याबाबत गांभिर्याने दखल घेणे गरजेचे ठरणार आहे.