कळमसरे शिवारात बिबटय़ाकडून शेळी फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:57 AM2019-09-01T11:57:43+5:302019-09-01T11:57:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील कळमसरे शिवारात बिबटय़ा नर-मादीचे वास्तव्य कायम असल्याने शेतक:यांसह मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील कळमसरे शिवारात बिबटय़ा नर-मादीचे वास्तव्य कायम असल्याने शेतक:यांसह मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. मोहिदा येथील विनोद कोळी यांच्या शेतातील घराजवळ हल्ला करून शेळी फस्त केल्याची घटना घडली. बिबटय़ाच्या दहशतीमुळे शेतीकामांवर विपरीत परिणाम होत असून शेतमजूर कामाला येण्यासाठी धजावत नसल्याची स्थिती आहे.
शेळीवर हल्ला केल्याच्या घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर पथकाने येऊन त्याठिकाणी फटाके फोडून मिरचीचा धुराळा सोडला. कळमसरे शिवारात उसाच्या शेतात व वडाच्या झाडावर हे बिबटय़ा नर-मादी वारंवार आढळून येत असल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे. त्यामुळे शेती कामांवर परिणाम झाला असून पिकांच्या आंतरमशागतीची कामे रखडली आहेत. वनखात्याने या परिसरात पिंजरे लावून या बिबटय़ांना पकडावे, अशी मागणी कळमसरे, मोहिदा व मोड गावातील ग्रामस्थांनी केली आहे.