श्रावणसरी ङोलत कानुबाईला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:29 PM2019-08-06T12:29:52+5:302019-08-06T12:30:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खान्देशची कुलदैवत कानुबाई मातेचा उत्सव जिल्हाभरात उत्साहातपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. श्रावणसरी अंगावर ङोलत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खान्देशची कुलदैवत कानुबाई मातेचा उत्सव जिल्हाभरात उत्साहातपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. श्रावणसरी अंगावर ङोलत भाविकांनी मातेला निरोप दिला. यानिमित्त सर्वत्र चैतन्य व उत्साहाचे वातावरण होते.
प्रकाशा येथे भाविकांची गर्दी
प्रकाशा, ता.शहादा येथील सूर्यकन्या तापी नदीत सोमवारी सकाळपासूनच कानु मातेच्या विसर्जनासाठी प्रकाशासह पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. पहिला श्रावण सोमवार असल्याने याठिकाणी भाविकांची तुरळक गर्दी दिसून आली. या वेळी परिसरातील भाविकांनी कानु मातेला डोक्यावर धरून घाटावर विसजर्नासाठी आणले होते. याप्रसंगी आरती केल्यानंतर पाण्यात उतरून देवीला स्वत:च्या हाताने स्नान घालून विसर्जन करण्यात आले. दरम्यान, दुपारी दोन वाजेर्पयत परिसरातील भाविक वाजत गाजत डोक्यावरून कानुमातेला विसजर्नासाठी घाटावर आणत होते. त्यामुळे याठिकाणी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे प्रकाशातील तापी नदीदेखील दुथडी भरून वाहत असल्याने भाविकांनी नदीत उतरून कानू मातेचे विसर्जन उत्साहपूर्ण वातावरणात केले.
भर पावसात विसर्जन, खेतिया
खेतिया, ता.शहादा येथे सामाजिक व पारिवारिक ऐकतेचे प्रतिक मानल्या जाणा:या कानुबाई मातेची स्थापना रविवारी मोठय़ा उत्साहात खेतिया येथे ठिकठिकाणी वाजत-गाजत स्थापना करण्यात आली होती. सोमवारी ठिकठिकाणी स्थापना केलेल्या कानुबाई मातेची धूम धडाक्यात वाजत गाजत, ढोल - ताशांच्या गजरात शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी गावाबाहेरील विहिरीजवळ कानुमातेचे विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी प्रशासनातर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
काथर्दा दिगर
काथर्दा दिगर, ता.शहादा येथे रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात कानुमातेची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान भाविकांनी रात्रभर जागरण करीत उत्साहपूर्ण वातावरणात उत्सव साजरा केला. सोमवारी सकाळी काढण्यात आलेल्या विसजर्न मिरवणुकीत डीजेच्या तालावर भाविकांनी ठेका धरीत उत्साहपूर्ण वातावरणात बसस्थानक परिसरातील नदीत कानुबाई मातेला निरोप दिला.
बोरद
तळोदा तालुक्यातील बोरद परिसरात रविवारी सायंकाळी कानुमातेची उत्साहपूर्ण वातावरणात स्थापना करण्यात आली. या वेळी अनेकांनी कानुमातेने नवस पूर्ण केल्याने नवस फेडल्याचे दिसून आले. तसेच कानुमातेच्या विविध गीतांवर महिला व पुरूषांनी तालधरीत रात्रभर जागरण केले. सोमवारी सकाळी आठ वाजेपासून गावात विसजर्न मिरवणुकींना सुरूवात झाली होती. या मिरवणुकीत डी.जे. व ढोल-ताशांच्या तालावर भाविकांनी ठेका धरीत कानुमातेला उत्साहपूर्ण वातावरणात निरोप दिला.
ब्राrाणपुरी
ब्राrाणपुरी, ता.शहादा येथे खान्देशची कुलस्वामिनी कानुमातेची स्थापना रविवारी उत्साहातपूर्ण वातावरणात करण्यात आली होती. या वेळी भाविकांनी रात्रीभर कानुमातेच्या विविध गीतांवर नृत्य करीत रात्रभर जागरण केले. दरम्यान, सोमवारी सकाळी आठ वाजेपासून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या वेळी तरुण-तरुणाईनी फुगडी खेळून आनंद साजरा केला. रविवारी रात्री भजनासह नाच गाण्यांचे आयोजन करण्यात आले होते. कानुमाता उसत्वानिमित्त सर्वत्र चैतनाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.