शेतकरी केंद्रबिंदू ठेवून सरकारने धोरणे राबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:20 PM2017-10-10T12:20:53+5:302017-10-10T12:20:53+5:30

पुरुषोत्तम पुरस्काराचे वितरण : शहाद्यात ना.धों. महानोर यांचे प्रतिपादन

 Government policies should be implemented by keeping farmer centricity | शेतकरी केंद्रबिंदू ठेवून सरकारने धोरणे राबवावी

शेतकरी केंद्रबिंदू ठेवून सरकारने धोरणे राबवावी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शेतकरी मेला तर राष्ट्र   मरेल आणि म्हणून शेतकरी जीवंत राहिला पाहिजे. सरकारने शेतकरी केंद्रबिंदू ठेवून धोरणे राबवली पाहिजेत, असे प्रतिपादन माजी विधान परिषद सदस्य व कवी ना.धों. महानोर यांनी पुरुषोत्तम पारितोषिक प्रदान सोहळ्याप्रसंगी केले.
शहादा तालुक्याचे भाग्यविधाते स्व.पी.के. अण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी विचार मंथन व किसान दिन साजरा करण्यात आला. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ व श्री.पी.के. अण्णा पाटील फाऊंडेशन आयोजित या कार्यक्रमात पुरुषोत्तम पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रांगणात सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, इतिहासाचार्य वि.का. राजवाडे इतिहास संशोधन मंडळ धुळेचे अध्यक्ष मदनलाल मिश्रा, सचिव संजय मुंदडा, अ.भा. गुजर्र महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.रामसरण भाटी, मध्य प्रदेशचे आमदार डॉ.रामकृष्ण दोगणे, अ.भा. गुजर्र महासभेचे जनरल सेक्रेटरी डॉ.जिलेसिंग कपासीया, दिल्ली  प्रदेश गुजर्र महासभेचे अध्यक्ष  इंद्रराज चौधरी, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरीष चौधरी, जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष  विजय चौधरी, उपनगराध्यक्षा  रेखा चौधरी, लखन भतवाल, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, दूध उत्पादक संघाचे चेअरमन रवींद्रसिंग राऊळ, साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा कमलताई पाटील, व्हा.चेअरमन प्रेमसिंग अहेर,   बापू जगदेव आदी मान्यवर उपस्थित होते.
स्व.पी.के. अण्णा पाटील व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे प्रारंभी पूजन करण्यात आले. यंदाचा पुरुषोत्तम पुरस्कार कवी ना.धों. महानोर व इतिहासाचार्य वि.का. राजवाडे इतिहास संशोधन मंडळ धुळे यांना देण्यात आला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ना.धों. महानोर, मदनलाल मिश्रा व संजय मुंदडा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी महानोर यांनी आपल्या भाषणाची सुरुवात साने गुरुजींची ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या प्राथनेने करून पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, साने गुरुजींनी खान्देशात संस्काराची जी बिजे रोवली त्यात पी.के.अण्णा आहेत. संस्कारांची ओंजळ अण्णांनी भरून परिसरात नवी सृष्टी निर्माण केली. सत्तेत असो वा नसो अण्णांनी शेतकरी केंद्रबिंदू मानून परिसराचा विकास केला. शेतकरी समृद्ध करायचा असेल तर पाण्याचे  नियोजन महत्त्वाचे असल्याचे सांगून सरकारने धरणे बांधण्याची गती वाढवली पाहिजे, शेतकरी हिताचे धोरण राबवले पाहिजे, असे  सांगितले. पी.के. अण्णांच्या         कार्याचा गौरव करून आपण अण्णांसोबत काम केल्याचेही त्यांनी सांगितले. ‘या नभाने या भूमीला दान द्यावे’ या कवितेने त्यांनी मनोगताचा समारोप केला.
राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी चौफेर फटके मारत राजकारणातील गुण-दोष मांडले. पी.के. अण्णांनी खान्देशशी नातं जोडत शिक्षणाचे जाळे उभारल्याचे सांगून त्यांच्या प्रय}ानेच हा परिसर फुलल्याचे सांगितले. पी.के. अण्णांनी शेतक:यांच्या विकासासाठी परिश्रम घेतले. खान्देशातील आमदारांनीही शेतक:यांसाठी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्यासाठी सरकारने एकाचवेळी अनेक प्रकल्पांची कामे सुरू न करता एकावेळी एकच प्रकल्प हाती घेऊन तो पूर्ण केला पाहिजे. सरकारमध्ये असूनही जनतेच्या हितासाठी लोकप्रतिनिधी म्हणून टीका करावी लागते. लोकांचा विकास महत्त्वाचा असल्याने लोकांशी प्रामाणिक राहून राजकीय क्षेत्रातील लोकांनी काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पी.के. अण्णांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार माङया हस्ते दिला गेला हा माङया जीवनातील सर्वात मोठा क्षण असून तो कायम माङया स्मरणात राहील, असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी स्व.पी.के. अण्णांच्या कार्याचा परिचय करून दिला. शासनाची काहीही मदत न घेता जनतेच्या पैशातून अण्णांनी तालुक्याचा विकास घडविला. प्रामाणिकपणे काम केले तर माणूस यशस्वी होतो ही शिकवण अण्णांनी आम्हास दिली. पी.के. अण्णा फाऊंडेशनच्या माध्यमातून जलपुनर्भरण, रुग्णवाहिका असे विविध उपक्रम राबवीत असल्याचे त्यांनी सांगितले. अण्णांच्या दूरदृष्टीतूनच साखर कारखाना, सूतगिरणी, कॉलेज उभे राहिल्याचे सांगून त्यांच्या कार्याचा हा वारसा असाच पुढे चालू राहील, अशी ग्वाही दिली.
आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार शिरीष चौधरी, आमदार रामकृष्ण दोगणे, रामसरण भाटी, संजय मुंदडा यांनीही या वेळी मनोगत   व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य   मकरंद पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्राचार्य शरद पाटील यांनी केले.
 

Web Title:  Government policies should be implemented by keeping farmer centricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.