Vidhan Sabha 2019 : अवैध मद्य व शस्त्र पकडून दाखवा, बक्षीस देवू..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:27 PM2019-09-24T12:27:57+5:302019-09-24T12:28:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्थिर सर्वेक्षण पथक आणि भरारी पथकांनी अवैध मद्य व शस्त्र वाहतूक रोखण्यासाठी विशेष प्रय} ...

Grab illegal alcohol and weapons, show prizes .. | Vidhan Sabha 2019 : अवैध मद्य व शस्त्र पकडून दाखवा, बक्षीस देवू..

Vidhan Sabha 2019 : अवैध मद्य व शस्त्र पकडून दाखवा, बक्षीस देवू..

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : स्थिर सर्वेक्षण पथक आणि भरारी पथकांनी अवैध मद्य व शस्त्र वाहतूक रोखण्यासाठी विशेष प्रय} करावेत, उत्कृष्ट काम असणा:या पथकाला प्रमाणपत्र स्मृतीचिन्हाने सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने तसा निर्णय घेतला आहे. 
निवडणूक काळात चांगले काम व्हावे यासाठी प्रशासन विविध माध्यमातून अधिकारी, कर्मचा:यांना सक्रीय करीत आहेत. बक्षीस देण्यासंदर्भातील हा त्यातीलच एक प्रय} आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमलेल्या विविध पथकांच्या कार्यपद्धतीसंदर्भात प्रशिक्षण वर्ग झाला. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवडणूक उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी धमेंद्र जैन, अप्पर कोषागार अधिकारी प्रकाश बानकर, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जयेश खैरनार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, निवडणूक आचारसंहिता कालावधीत सर्व पथकांनी नेहमी सतर्क रहावे. सोपविण्यात आलेली जबाबदारी वेळेनुसार आणि व्यवस्थित पार पाडावी. परस्पर समन्वयाने काम करावे. भरारी पथकांनी महत्वाच्या मार्गावर विशेष लक्ष द्यावे आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरीत कारवाई करावी.
जगदाळे यांनी यावेळी आचारसंहितेविषयी मार्गदर्शन केले. सर्वांनी नेमून दिलेल्या ठिकाणी नेहमी वेळेवर उपस्थित रहावे व वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीचे अहवाल जिल्हास्तरावर सादर करावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी खांदे यांनी सादरीकरणाद्वारे पथकांच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. बानकर यांनी निवडणूक खर्च,  जैन व खैरनार यांनी सीव्हीजील अॅप याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस नेमणूक केलेल्या पथकातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.    
 

Web Title: Grab illegal alcohol and weapons, show prizes ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.