शहादा येथे ग्रामपंचायत निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम ६०० कर्मचारी ; तहसीलदारांकडून मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 12:39 PM2021-01-02T12:39:17+5:302021-01-02T12:39:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : निवडणुकीचे काम थोडेसे वेगळे असले तरी सकारात्मक राहून प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे, अशा सूचना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : निवडणुकीचे काम थोडेसे वेगळे असले तरी सकारात्मक राहून प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे, अशा सूचना शहाद्याचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिल्या. ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.
तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्राथमिक स्तरावर ६०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांतर्गत शहरातील चावरा इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये शुक्रवारी दोन सत्रात मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार डाॅ. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी नायब तहसीलदार राजेंद्र नांदोडेव कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आदींची माहिती प्रात्यक्षिकासह समजावून सांगण्यात आली. तसेच मॉकपोल, विविध नमुन्यातील घोषणापत्रे इतर नमुने यांची माहिती भरण्यासंबंधी मार्गदर्शन केले. यावर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुका कोविड-१९ काळात होत असल्याने मतदाराला मतदानावेळी मास्क लावणे बंधनकारक केले आहे. केंद्रावरील अधिकारी कर्मचाऱ्यांनीही शासनाने निर्धारित केलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
प्रशिक्षणादरम्यान कोविड-१९ च्या नियमांचे पालन करूनच बैठक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले होते.