गुजरातमधील प्रवासी वाहतुकीला मोठा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 01:05 PM2020-11-29T13:05:50+5:302020-11-29T13:05:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरातमधील आंतरराज्य बस वाहतुकीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे. मध्यप्रदेशात मात्र बसफे-या कमी असल्याने तिकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गुजरातमधील आंतरराज्य बस वाहतुकीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे. मध्यप्रदेशात मात्र बसफे-या कमी असल्याने तिकडे फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. नंदुरबार आगारातून दोन्ही राज्यांच्या मिळून एकुण २१ फे-या होत आहेत.
गुजरातमध्ये सद्या कोरोनाचा कहर सुरू आहे. असे असतांनाही गुजरातकडे जाणा-या अर्थात सुरत, अहमदाबाद, अंकलेश्वर, बडोदाकडे जाणाऱ्या बसेसमध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर राहत आहे. या भागात खान्देशातील अनेकजण नोकरी, रोजगारानिमित्त स्थायिक झाले आहेत. त्यामुळे दररोजचा त्यांच्याशी संपर्क व व्यवसाय, वैद्यकीय सेवेच्या निमित्ताने देखील या दोन्ही राज्यात लोकांचे येणेजाणे सुरू असते. त्यामुळे दोन्ही राज्याच्या एस.टी.सेवेला चांगला प्रतिसाद आहे. उत्पन्न देखील चांगले मिळत असल्याचे येथील आगार प्रमुखांनी स्पष्ट केले.
मध्यप्रदेशातील बसेला मिळताे अल्प प्रतिसाद
मध्यप्रदेशात प्रवासी वाहतुकीच्या बसेसला अल्प प्रतिसाद आहे. केवळ मध्यप्रदेशातील दोन ते तीन बसेस शहादा मार्गे नंदुरबार पर्यंत येतात. परंतु नंदुरबार आगाराची एकही बस मध्यप्रदेशात जात नाही. या उलट गुजरातमधील प्रवासी सेवेला चांगला प्रतिसाद आहे. दोन्ही राज्यांच्या डेपोच्या समन्वयाने बसफेरऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य परिवहनच्या दोन्ही राज्यातील बसेस व्यतिरिक्त खाजगी प्रवासी वाहतुकीच्या बसेस देखील मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. सुरत व अंकलेश्वर येथे या बसेस धावतात. सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव त्या भागात वाढल्याने आवश्यक ती काळजी घेऊनच प्रवासी वाहतूक केली जात आहे.
नंदुरबार आगारातून सुरत, अहमदाबाद, बडोदा व अंकलेश्वर येथे बसेस सोडल्या जातात. आंतरराज्य बसेसमध्ये कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विशेष दक्षता घेतली जाते. सर्व बसेस आगारातूनच निर्जूंतीकरण करून पाठिवल्या जातात.
-मनोज पवार, आगार प्रमुख, नंदुरबार.