शहाद्यात भव्य एकता रॅलीने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:47 PM2018-11-01T12:47:51+5:302018-11-01T12:47:56+5:30
शहादा : सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त शहाद्यात भव्य सांस्कृतिक रॅली काढण्यात आली़ 100 पेक्षा अधिक कलापथके, युवक, युवती यांच्यासह ...
शहादा : सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त शहाद्यात भव्य सांस्कृतिक रॅली काढण्यात आली़ 100 पेक्षा अधिक कलापथके, युवक, युवती यांच्यासह हजारो नागरिकांच्या सहभागाच्या या रॅलीद्वारे सरदार पटेलांना अभिवादन करण्यात आल़े शहरातील विविध संस्था, संघटनांनी मिळून ही राष्ट्रीय एकता रॅली काढली. रॅलीत सजीव देखाव्यांसह प्रबोधनात्मक उपक्रम सादर करण्यात आले.
शहाद्यात प्रथमच गुजर्र समाज संस्था व संघटनांतर्फे सरदार पटेल जयंती व रॅलीचा हा उपक्रम घेण्यात आला. शुभारंभ माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार अमरिशभाई पटेल, आमदार उदेसिंग पाडवी, सातपुडा साखर कारखाना अध्यक्ष दिपक पाटील, नगराध्यक्ष मोतिलाल पाटील, उपनगराध्यक्ष रेखाबाई चौधरी, माजी नगराध्यक्षा कांताबेन पाटील, सुभाष पाटील, नगरसेवक प्रा.मकरंद पाटील, जि.प.सदस्य अभिजीत पाटील, स्वाभिमानीचे अध्यक्ष घनश्याम चौधरी, कंचन पाटील, माधवी पाटील, प्रिती पाटील, माजी नगराध्यक्ष अशोक बागुल, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ़ कांतीलाल टाटिया, डॉ़ किशोर पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
रॅली शहरातील विविध भागातून फिरविण्यात आली. रॅलीचे मुख्य आकर्षण असलेला 100 मिटर लांबीचा तिरंगा महिलांनी अभिमानाने मिरविला. युवतींचे लेझीम पथक लक्षवेधी ठरले होते. मिरवणुकीत विविध सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करण्यात आले. जागोजागी थंड पेय, नाश्ताची सोय करण्यात आली होती. रॅलीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. हजारो तिरंगी फुगे आकाशात सोडण्यात आले. रॅलीच्या मागोमाग विविध शहर ग्राम गुजर समाज मंडळाच्या कार्यकत्र्यानी स्वच्छता अभियान राबविले.
रॅलीत रामचंद्र पाटील, ईश्वर पाटील, किशोर पाटील, श्रीपत पटेल, के.डी.पाटील, अॅड.गोविंद पाटील, हरी दत्तू पाटील आदींसह विविध धर्मीय व पक्षीय पदाधिकारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
यशस्वीतेसाठी राकेश पाटील, प्राचार्य ईश्वर पाटील, गिरीश पाटील, विनोद पाटील, सुनील पाटील, तुषार पाटील, अनिल पटेल, मुन्ना पाटील, जयदेव पाटील, वैकुंठ पाटील, भरत पाटील, संजय पाटील, उमाकांत पाटील, राजेंद्र पाटील आदींनी परिश्रम घेतले.