नंदुरबारातील मक्याच्या मागणीत मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 05:06 PM2018-08-03T17:06:40+5:302018-08-03T17:06:47+5:30

गुजरातेत होतेय निर्यात : पर्यटन ठिकाणी मागणी, शेतक:यांनाही मिळतेय उत्पन्न

Greater demand for the demand for maize in Nandurbar | नंदुरबारातील मक्याच्या मागणीत मोठी वाढ

नंदुरबारातील मक्याच्या मागणीत मोठी वाढ

Next

कोठार :  तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात घेतल्या जाणा:या पावसाळी हंगामातील मकईला गुजरातमध्ये मागणी वाढली आहे. त्यामुळे मकईच्या खरेदीसाठी गुजरातमधील व्यापारी परिसरात दाखल झाल्याचे दिसून येत आहे.
साधारणत: मेअखेरीस व जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाडय़ात सातपुडय़ाच्या पायथ्याशी शेती करणारे तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील शेतकरी मोठय़ा प्रमाणात मकईची लागवड करतात.  तीन ते चार महिन्यांचे हे पिक  शेतक:यांना अल्प कालावधीत मोठय़ा प्रमाणात आर्थिक उत्पन्न देत असत़े उत्पादन खर्चदेखील इतर पिकांच्या तुलनेने कमी असतो. याशिवाय त्याच्या विक्रीसाठी शेतक:यांना थेट बाजारपेठत जावे लावत नाही. व्यापारी शेताच्या बांध्यावर येऊन शेतमालाची खरेदी करतात़ त्यामुळे हे पिक घेणे शेतक:यांना सोयीस्कर ठरत असत़े मकईच्या कणीसांना गुजरातमध्ये विशेषत: पर्यटन स्थळांवर मोठय़ा  प्रमाणात मागणी वाढली आह़े त्यामुळे तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील शेतशिवारांतून शेकडो मकईच्या गाडय़ा भरून गुजरात राज्यातील सुरत, नवसरी, भरुच, अंकलेश्वर, बडोदा शहरात रवाना होत आहेत. मकई उत्पादक शेतक:यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे. एकरी साधारणत: 20 ते 25 क्विंटल मकईचे उत्पादन शेतकरी मिळवतात. त्यामुळे कमी कालावधीत जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे पीक म्हणून मका या पिकाकडे बघितले जात असते. याशिवाय मकई कणीस निघाल्यानंतर त्यापासून मिळणारा हिरवा चारा म्हणजेच हिरवा कडबा चारा म्हणून उपयुक्त ठरत आह़े मकईचा हिरवा कडबा जनावरांसाठी पौष्टिक मानला जातो. त्यामुळे पशुपालकांकडून मकाईच्या हिरव्या कडब्याला देखील मोठय़ा प्रमाणात मागणी असते. 

Web Title: Greater demand for the demand for maize in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.