रावलापाणी येथे शहिदांना विविध कार्यक्रमांनी अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:35 PM2018-03-04T12:35:01+5:302018-03-04T12:35:01+5:30
रावलापाणी : स्मारकासाठी लवकरच निविदा प्रक्रियेला होणार सुरुवात
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 4 : रावलापाणी ता़ तळोदा येथे विविध उपक्रमांनी शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली़ या वेळी येत्या वर्षभरात नंदुरबार जिल्ह्याला व्यसनमुक्त करण्याचा मानस आमदार डॉ़ विजयकुमार गावीत यांनी व्यक्त केला़
2 मार्च 1943 रोजी तळोदा येथील निझरा नदीचा पात्रात इंग्रज शिपायांनी अमानुषपणे गोळीबार केला़ त्यात, पंधरा जण शहिद तर 28 जण जखमी झाल्याची घटना घडली होती़ त्या घटनेची 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रावलापाणी येथे शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता़
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ़ विजयकुमार गावीत उपस्थित होत़े सोबत, जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, अखिल भारतीय आदिवासी महासंघाचे डॉ़ भरत वळवी, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक मधुकर पाडवी, सज्रेराव भामरे, कार्यकारी अभियंता ङोलसिंग पावरा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गजानन डांगे, नीलेश गजरे, विरेंद्र वळवी, उपविभागीय अधिकारी विनय गौंडा, तहसीलदार योगेश चंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती़
या वेळी आमदार गावीत पुढे म्हणाले की, गुलाम महाराज यांनी सुरु केलेली सर्व प्रकारच्या व्यसनमुक्तीची चळवळ पुन्हा सुरू करण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आह़े आज तरुण पिढी मोठय़ा संख्येने व्यसनात अडकलेली आह़े त्यासाठी पुन्हा व्यसनमुक्ती चळवळ सुरू करणे आवश्यक असल्याचे दिसत आह़े तंबाखूजन्य पदार्थ, दारू इतर अमली पदार्थावर जिल्ह्यात संपूर्ण बंदी जावी अशी अपेक्षाही या वेळी व्यक्त करण्यात आली़ प्रशासनही व्यसनमुक्तीसाठी परिश्रम घेत असून याला नागरिकांचीही जोड मिळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाल़े
जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांनी सांगितले की, शहिद स्मारकासाठी 2 कोटी 56 लाखांचा निधी प्राप्त झाला असून येत्या पंधरा दिवसात निविदा प्रकिया सुरु होणार आह़े
त्यानंतर दोन महिन्यांत स्मारकाचे भूमिपूजन केले जाणार असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली़ पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, व्यसन व दारुबंदी यावर विचार व्यक्त केलेत़