घरोघरी ईश्वरी प्रकाश भेट देत सुरु झाला नाताळ उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:36 PM2018-12-18T12:36:47+5:302018-12-18T12:36:54+5:30
नंदुरबार : प्रभू येशूच्या संदेशाची विविध गीते सादर करुन घरोघरी मेणबत्ती भेट देत चिमुरडय़ांकडून नाताळला सुरुवात झाली आह़े उत्सावासाठी ...
नंदुरबार : प्रभू येशूच्या संदेशाची विविध गीते सादर करुन घरोघरी मेणबत्ती भेट देत चिमुरडय़ांकडून नाताळला सुरुवात झाली आह़े उत्सावासाठी ािस्ती वसाहतींमध्ये केलेल्या रोषणाईमुळे उत्सवाच्या उत्साहात भर पडत असून महिलांकडून फराळ बनवण्याच्या प्रक्रियेलाही वेग आला आह़े
शहरातील मिशन कंपाउंड, आशिर्वाद कॉलनी, कोकणी हिल परिसर, तळोदा रोडवरील बेथेल कॉलनी या भागात असलेल्या ािश्चन बांधवांच्या वसाहतीत 10 दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळच्या तयारीला वेग आला आह़े 22 तारखेपासून या उत्सवाला सुरुवात करण्यात येणार असून तत्पूर्वी पारंपरिक शुभेच्छा गीतांना सुरुवात झाली आह़े रविवारी सायंकाळपासून 4 ते 14 वयोगटातील मुले-मुली घरोघरी जाऊन देवाचे स्मरण करणारी गिते गात आहेत़ यावेळी त्यांच्याकडून मेणबत्तीद्वारे ईश्वरी प्रकाश मोठय़ांना भेट देत त्यांच्याकडून भेट म्हणून देणगी स्विकारण्यात येत आह़े नाताळच्या दिवशी गोळा झालेली देणगी मुलांच्या विविध पथकांकडून गोरगरीब, अंध आणि अपंगांना दान करण्यात येणार आह़े घरोघरी नाताळचा उत्साह असताना बाजारपेठेवरही नाताळचे चैतन्य पसरले आह़े शहरातील बाजारपेठेसह सिंधी कॉलनी परिसरातील दुकानांमध्ये ािसमस ट्री, रंगीबेरंग दिवे, स्टार्स, कागदी आकशकंदील, सांताक्लॉजच्या मऊ टोप्या आणि शुभेच्छा संदेश असलेले कार्डस विक्रीसाठी आले आहेत़ बाजारात साधारण 2 ते 14 फूटांची 2 हजार रुपयांर्पयतची ािसमस ट्री बाजारात विक्रीसाठी आणली गेली आह़े ािस्ती बांधवांकडून या साहित्याची खरेदी करण्यात येत असल्याने आर्थिक उलाढाल होत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आह़े महिलांकडून फराळासाठी लागणा:या किराणा मालाचीही खरेदी झाल्याने उलाढाल वाढल्याचे किराणा व्यावसायिकांनी सांगितल़े नाताळ उत्सवांतर्गत रविवारी फँकलीन मेमोरियल चर्चमध्ये शांताराम मरसाळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होत़े यावेळी नाताळांच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आल़े 22 पासून संडेस्कूल कार्यक्रमाने उत्सवाला सुरुवात होणार आह़े शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता दुधाळे शिवारातील चर्चमध्ये प्रा़अॅबिएल जांबीलसा व संडेस्कूल शिक्षक यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम रंगणार आह़े 1 जानेवारीर्पयत हे उपक्रम सुरु राहणार आहेत़ दरम्यान सायंकाळनंतर मिशन कंपाउंड व कोकणी हिल येथील चर्चमध्ये गीतांची तयारी करणारी मुलांची पथकं दिसून येत आहेत़ ईलेक्ट्रीक की-बोर्ड आणि गिटारच्या सूरावटींवर त्यांची ही तयारी सुरु आह़े