भूजल तपासणीत जिल्हा अव्वल, सुविधेत मात्र बोंब
By admin | Published: January 8, 2017 11:48 PM2017-01-08T23:48:53+5:302017-01-08T23:48:53+5:30
प्रयोगशाळेचा पत्ता सापडेना : सामान्य रुग्णालय कर्मचारी निवासस्थानातून कारभार
नंदुरबार : जिल्ह्यातील जलनमुन्यांची तपासणी करून तत्काळ निर्णय देणारी जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा ‘बेपत्ता’ आह़े देशात आणि राज्यात अव्वल असलेल्या या प्रयोगशाळेत सुविधा देण्याबाबत आरोग्य विभागाची उदासिनता तेथील कामकाजावर परिणामकारक ठरत आह़े स्वच्छता विभागाच्या मुख्य संकेतस्थळावर सेकंदात दिसणारी ही प्रयोगशाळा प्रत्यक्षात शोधण्यासाठी काही तास फिरफिर करावी लागत आह़े
गेल्या तीन वर्षात नागरिकांना जलजन्य आजारांच्या संकटांपासून वाचवण्यासाठी सातत्याने प्रशासनाला जलनमुने तपासणीची माहिती देत कामकाज सुरू ठेवणा:या या जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत अनेक समस्या आहेत़ हक्काची इमारत नसलेली ही प्रयोगशाळा आहे कुठे, याचा शोध लागत नसल्याने नमुने घेऊन येणा:यांची प्रचंड फिरफिर होत़े
गेल्या दीड वर्षापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील ही प्रयोगशाळा रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्मचारी वसाहतीत स्थलांतरित करण्यात आली़ या स्थलांतरानंतर सुविधा मिळतील या आशेवर असलेल्या कर्मचा:यांच्या अव्वल कामकाजाकडे आरोग्य विभागानेच दुर्लक्ष करत त्यांच्या माथी केवळ समस्या मारल्या़ नमुने तपासणीच्या प्रयोगासाठी लागणारे मुबलक पाणी, बसण्यासाठी खुच्र्या, लेखी कामासाठी टेबल या गोष्टींचा अभाव असूनही याठिकाणी कामकाज सुरूच ठेवण्यात आले होत़े प्रयोगशाळेसाठी वर्षभरापासून सामान्य रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीत जागा देण्यात आल्याचे सांगण्यात येत असले, तरी अद्याप त्याठिकाणी वीज नसल्याने स्थलांतर झालेले नाही़
जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात कर्मचारी वसाहतीतील नर्मदा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील प्रयोगशाळेत वेळेवर पाणी आणि वीज पुरवठा होत नसल्याने कर्मचारी त्रस्त आहेत़ या इमारतीत जिल्हा सार्वजनिक प्रयोगशाळा असा कोणताही फलक नसल्याने जलनमुने घेऊन येणा:या ग्रामपंचायत कर्मचा:यांची सुमारे तासभर फिरफिर होत़े
आधीच शहराबाहेर सामान्य रुग्णालयात पोहोचण्यासाठी होणारी कसरत आणि तेथे गेल्यानंतर ‘नर्मदा’ इमारतीतील प्रयोगशाळेचा वाढणारा शोध यामुळे अनेकांच्या घशाला कोरड पडत आह़े