जलसाठय़ामुळे भूजल पातळी वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:28 PM2019-07-10T12:28:04+5:302019-07-10T12:28:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : सातपुडय़ाच्या पायथ्याशी दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कोरडाठाक पडलेल्या रोझवा लघुसिंचन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : सातपुडय़ाच्या पायथ्याशी दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कोरडाठाक पडलेल्या रोझवा लघुसिंचन प्रकल्पात जलसाठा झाल्याने शेतक:यांनी समाधान व्यक्त केले आहे. रोझवा प्रकल्पात झालेल्या जलसाठय़ामुळे परिसरातील भूजल पातळी उचविण्यास मदत होणार आहे.
तळोदा तालुक्यातील रोझवा, कोठार, अंबागव्हाण, तोलाचापडा, वरपाडा या परिसरातील शेतक:यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून रोझवा लघुसिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळापासून हा प्रकल्प परिसरातील शेतक:यांसाठी संजीवनी ठरला आहे.
या प्रकल्पाची जलसाठा क्षमता 1.73 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. मात्र मागील दोन वषार्पासून दुष्काळी परिस्थितीमुळे या प्रकल्पात अत्यल्प जलसाठा होत होता. मागीलवर्षीही हा प्रकल्प समाधानकारक भरला नव्हता. यावर्षी मात्र पहिल्याच पावसात या प्रकल्पात समाधानकारक जलसाठा झाला आहे.
मागील आठवडाभरापासून सातपुडा पर्वतरांगेत व पायथ्याशी दमदार पाऊस सुरू आहे. पावसाच्या या दमदार हजेरीमुळे रोझवा प्रकल्पाच्या जलसाठय़ात दिवसेंदिवस वाढ होत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हा प्रकल्प कोरडाठाक पडल्याने परिसरातील पाणी पातळी खालावली होती. त्यामुळे या प्रकल्पात कधी जलसाठा होता याकडे परिसरातील शेतक:यांचे लक्ष लागून होते. या प्रकल्पात जलसाठा झाल्याने परिसरातील पाणी पातळी उंचावण्यास मदत होणार असल्याने शेतक:यांमधून समाधान व्यक्त होत आहे.