नदी नांगरटीमुळे चार वर्षात भूजल वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 11:56 AM2017-08-14T11:56:12+5:302017-08-14T11:56:12+5:30

पर्यावरण रक्षणासाठी अनोखा प्रयोग : धुरखेडा येथील शेतकरी आणि युवकांचा पुढाकार

 Groundwater has increased for four years due to river Nangrati | नदी नांगरटीमुळे चार वर्षात भूजल वाढले

नदी नांगरटीमुळे चार वर्षात भूजल वाढले

Next
ठळक मुद्दे एक किलोमीटर पात्रात होते नांगरटी 4शहादा तालुक्यात नदी नांगरटीचा पहिला प्रयोग शहाद्याचे विद्यमान नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी केला होता़ या प्रयोगानंतर पाणी पातळीत वाढ झाल्याने तालुक्यात ठिकठिकाणी नदीनांगरटीला सुरूवात करण्यात आली़ 4धुरखेडा गावालगत वा


लोकमत ऑनलाईन
दिनांक 14 ऑगस्ट
म्हसावद : नदीतून वाहून जाणारे पाणी अडवता येणे शक्य होत नसले, तरी त्या पाण्याला नदीपात्रातच जिरवल्यास आसपासच्या परिसरातील भूजल पातळी वाढते, असा अनोखा प्रयोग धुरखेडा ता़ शहादा येथील शेतक:यांनी यशस्वी करून दाखवला आह़े शासकीय मदतीविना हा प्रयोग सलग चौथ्यावर्षीही सुरू आह़े 
शहादा तालुक्यातील धुरखेडा परिसरातील शेतशिवारात गेल्या चार वर्षापूर्वी भूजल पातळी घट आल्याने शेतक:यांचे ऐन पिक हंगामात जलव्यवस्थापन कोलमडत होत़े पाणी पातळी वाढावी यासाठी ज्येष्ठ आणि तरूण शेतकरी यांनी एकत्र येत यावर चर्चा केली होती़ या चर्चेतून नदी नांगरटी करण्याचा अनोखी संकल्पना पुढे आली़ गावातील अंबालाल मणिलाल चौधरी, राजेंद्र शंकर चौधरी, कांतीलाल उद्धव पाटील यांनी तरूणांना हाती घेत, या उपक्रमाला सुरूवात केली होती़ गावालगत वाहणा:या गोमाई नदीपात्रात ट्रॅक्टरच्या सहाय्याने सलग नांगरटी करून वाहून आलेला गाळ कोरून काढण्याची पद्धत अवलंबण्यात आल्याने यामुळे पाणी थेट पात्रातच गेल़े पहिल्याच वर्षी शेतशिवारात वर्षभर कूपनलिका आणि विहिरी यांना पाणी होत़े चार वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमात संपूर्ण गावाने सहभाग देण्यास सुरूवात केली आह़े

Web Title:  Groundwater has increased for four years due to river Nangrati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.