जीएसटीमुळे नंदुरबारमध्ये ‘कही खुशी कही गम’

By admin | Published: July 4, 2017 12:16 PM2017-07-04T12:16:58+5:302017-07-04T12:16:58+5:30

पॉलिसी प्रीमियमच्या रकमेत वाढ : व्यावसायिकांची नोंदणी ठप्पच

GST to 'Kahi Khushi Kahi Gham' in Nandurbar | जीएसटीमुळे नंदुरबारमध्ये ‘कही खुशी कही गम’

जीएसटीमुळे नंदुरबारमध्ये ‘कही खुशी कही गम’

Next

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि.4 - देशात 1 जुलैपासून जीएसटी करप्रणाली लागू झाली आह़े या करप्रणालीचा बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला असून नंदुरबारच्या बाजारपेठेत यामुळे ‘कही खुशी कही गम’ असेच चित्र आह़े 
नंदुरबार शहरात अद्यापही व्यावसायिकांकडून ऑनलाइन बिलिंग सिस्टिम नसल्याने जीएसटी कसा कपात करावा, याबाबत अनभिज्ञता आह़े विविध कंपन्यांनी आपापल्या वस्तूंवर जीएसटी लावून व्यापा:यांना मालाची विक्री सुरू केल्याने व्यापारी बांधवांसमोर संभ्रम निर्माण झाला आह़े तर दुसरीकडे बँका आणि विमा पॉलिसी यांच्यासाठी ग्राहकांना जादाचा सेवाकर द्यावा लागणार आह़े मात्र याबाबत कोणत्याही प्रकारचे नवीन आदेश बँका आणि विमा विभाग यांना प्राप्त झालेले नसल्याने त्यांच्याही कामकाजावर परिणाम जाणवत आह़े बँकांच्या विविध समस्यांवर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनात सोमवारी बैठक बोलावण्यात आली होती़ या बैठकीत वाढ झालेल्या करांची अंमलबजावणी बँकांनी कशी करावी, याबाबत चर्चा करण्यात आली़ 
कृषी उत्पन्न बाजार समितीत याबाबत अद्यापही आदेश प्राप्त झालेले नसल्याने सर्व प्रकारच्या धान्य खरेदी आणि विक्री ही पूर्वीप्रमाणचे सुरू असल्याची माहिती देण्यात आली आह़े 

Web Title: GST to 'Kahi Khushi Kahi Gham' in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.