जीएसटीमुळे बाजारात ‘कही खुशी कही गम’
By admin | Published: July 4, 2017 12:57 AM2017-07-04T00:57:25+5:302017-07-04T00:57:25+5:30
पॉलिसी प्रीमियमच्या रकमेत वाढ : व्यावसायिकांची नोंदणी ठप्पच
नंदुरबार : देशात 1 जुलैपासून जीएसटी करप्रणाली लागू झाली आह़े या करप्रणालीचा बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला असून नंदुरबारच्या बाजारपेठेत यामुळे ‘कही खुशी कही गम’ असेच चित्र आह़े
नंदुरबार शहरात अद्यापही व्यावसायिकांकडून ऑनलाइन बिलिंग सिस्टिम नसल्याने जीएसटी कसा कपात करावा, याबाबत अनभिज्ञता आह़े विविध कंपन्यांनी आपापल्या वस्तूंवर जीएसटी लावून व्यापा:यांना मालाची विक्री सुरू केल्याने व्यापारी बांधवांसमोर संभ्रम निर्माण झाला आह़े तर दुसरीकडे बँका आणि विमा पॉलिसी यांच्यासाठी ग्राहकांना जादाचा सेवाकर द्यावा लागणार आह़े मात्र याबाबत कोणत्याही प्रकारचे नवीन आदेश बँका आणि विमा विभाग यांना प्राप्त झालेले नसल्याने त्यांच्याही कामकाजावर परिणाम जाणवत आह़े बँकांच्या विविध समस्यांवर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनात सोमवारी बैठक बोलावण्यात आली होती़ या बैठकीत वाढ झालेल्या करांची अंमलबजावणी बँकांनी कशी करावी, याबाबत चर्चा करण्यात आली़
कृषी उत्पन्न बाजार समितीत याबाबत अद्यापही आदेश प्राप्त झालेले नसल्याने सर्व प्रकारच्या धान्य खरेदी आणि विक्री ही पूर्वीप्रमाणचे सुरू असल्याची माहिती देण्यात आली आह़े नंदुरबार जिल्ह्यात जीएसटी या करप्रणालीबाबत व्यापा:यांकडे अद्यापही योग्य ती माहिती नसल्याने जुन्याच करांच्या हिशेबाने खरेदी -विक्रीचे व्यवहार सुरू आहेत़
बॅँकांच्या ग्राहकांना जीएसटी लावण्याबाबत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांना अद्याप आदेश आलेले नाहीत़ हे आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई होईल़ तूर्तास जिल्ह्यात जुन्या सेवाकरांच्या हिशेबाने सुरू आह़े
-संजय धामणकर, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, नंदुरबार
विमा संरक्षण घेतलेल्या 2016 नंतरच्या ग्राहकांना प्रीमियम भरणा करताना 18 टक्के जीएसटी द्यावा लागणार आह़े एलआयसी किंवा खासगी पॉलिसी घेतलेल्या ग्राहकांना हा कर बसेल, नव्या प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतरच नेमकी स्थिती समजून येईल़
-राजू अनारसे, विमा प्रतिनिधी़