आरोग्याच्या निधीवरून पालकमंत्री संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:41 PM2018-08-11T12:41:10+5:302018-08-11T12:41:20+5:30

जिल्हा नियोजन समिती सभा : क्रिडा अकॅडमीला चालना देणार

Guardian minister angry with health funding | आरोग्याच्या निधीवरून पालकमंत्री संतप्त

आरोग्याच्या निधीवरून पालकमंत्री संतप्त

Next

नंदुरबार : जिल्हा नियोजन व विकास मंडळाने जिल्हा परिषद आरोग्य विभागाला दिलेल्या 40 कोटीच्या विगतवारीवरून पालकमंत्री चांगलेच भडकले. महिनाभरात आरोग्याच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चित्र दिसले नाही तर जिल्हा आरोग्य अधिका:यांना तडकाफडकी निलंबीत करण्याचा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला. दरम्यान, बैठकीत 
जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आमदार सुरुपसिंग नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहासन नाईक, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्यासह प्रमुख अधिकारी व सदस्य उपस्थित होते.
जिल्हा नियोजन व विकास समितीने जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातील 35 कोटी रुपयांचा निधी आरोग्य केंद्र बांधकामासाठी आहेत. हा विषय बैठकीत निघाल्यावर जिल्हा आरोग्य अधिका:यांनी निधीच्या खर्चाची विगतवारी देण्याचा प्रय} केला. परंतु पालकमंत्र्यांचे त्यावर समाधान न झाल्याने त्यांनी आरोग्य विभागाने कामकाजात सुधारणा करण्याच्या सुचना दिल्या. डीपीडीसीने जर निधी मंजुर केला आहे तर खर्चासंदर्भात मुंबईला प्रस्ताव पाठविण्याची गरज काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. बांधकामांची स्थिती अतिशय संथ असल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात येत्या महिनाभरात कामात सुधारणा न झाल्यास जिल्हा आरोग्य अधिका:यांना निलंबीत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले. बैठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
विविध विषयांवर चर्चा
बैठकीत झालेल्या विविध विषयांवरील चर्चेनंतर बोलतांना पालकमंत्री रावल म्हणाले, शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात 27 हजार शेतक:यांना 105 कोटी 68 लाख रुपयांचा लाभ देवून शेतक:यांचा सातबारा कोरा केला आहे. बोंडअळीग्रस्त शेतक:यांना आतार्पयत 90 कोटी रुपयांचे वाटप दोन टप्प्यात करण्यात आले आहे. उर्वरित रक्कम देखील लवकरच दिली जाणार आहे. आदिवासी लाभाथ्र्याना विविध योजनांच्या लाभासाठी वारंवार फे:या माराव्या लागू नयेत यासाठी संबधित विभागाने योग्य नियोजन करावे.
नंदुरबारात क्रिडा अकॅडमी स्थापन करण्यासाठी प्रय} असून यातून आदिवासी विद्याथ्र्याना क्रिडा शिक्षणाचे योग्य मार्गदर्शन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील पडीत किल्ले, गढी यांची दुरूस्ती करण्यासाठी व होळी महोत्सवाला चालना देण्यासाठी नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी आदिवासी आश्रम शाळेतील मुलींना ते राहत असलेल्या ठिकाणीच जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली. 
आमदार उदेसिंग पाडवी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी वितरण करतांना समितीने आमदार, लोकप्रतिनिधी व नियोजन समितीचे सदस्य यांना विश्वासात घेवून विभागांना निधी वितरीत करावा अशी मागणी केली.
जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी नियोजन समितीच्या माध्यमातून झालेल्या खर्चाविषयी माहिती दिली. सूत्रसंचलन जिल्हा नियोजन अधिकारी उन्मेश सूर्यवंशी यांनी केले.
 

Web Title: Guardian minister angry with health funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.