नवापुरात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत मार्गदर्शन
By admin | Published: January 16, 2017 12:33 AM2017-01-16T00:33:35+5:302017-01-16T00:33:35+5:30
खांडबारा : यशदा, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने नवापूर येथील सार्वजनिक गुजराथी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांसाठी
खांडबारा : यशदा, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने नवापूर येथील सार्वजनिक गुजराथी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांसाठी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन तहसीलदार प्रमोद वसावे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी नायब तहसीलदार योगेश चंद्रे, यशदाचे प्रतिनिधी विवेक नायडू, तज्ज्ञ मार्गदर्शक मुख्याध्यापक मिलिंद वाघ, अंबालाल पाटील, आर.व्ही. पाटील, दिलीप बोरसे, सुनीता गावीत, सावित्री वळवी, गोपाल पवार, राजेंद्र चव्हाण, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव सुनील भामरे, प्राचार्य संजीव पाटील उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणानंतर जिल्ह्यातील प्रत्येक माध्यमिक शाळेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली. विवेक नायडू यांनी मार्गदर्शन केले. नवापूर तालुक्यातील 52 शाळांच्या मुख्याध्यापकांचे तीन गट तयार करून सार्वजनिक गुजराथी शाळा, शिवाजी हायस्कूल व वनिता विद्यालयात हे प्रशिक्षण देण्यात आले. प्रास्ताविक गोपाल पवार यांनी केले. कार्यशाळेसाठी मुख्याध्यापक संजीव पाटील, मुख्याध्यापक संघाचे सुनील भामरे, रवींद्र वाघ, अजिम शेख, मनेश लोहार यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)